शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

भिवंडीत लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:38 IST

भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलात आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. या आगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाक झाली.काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलातील संकुलातील इमारत क्र.ए-५ मधील गाळा क्र. १ व २ मध्ये आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत ...

ठळक मुद्देआगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाकआग विझविण्याचे साधन सामुग्री नसल्याने चार गोदामे जळालीअग्निशामक दलाच्या प्रयत्नाने दोन तासात आग आटोक्यात

भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलात आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. या आगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाक झाली.काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलातील संकुलातील इमारत क्र.ए-५ मधील गाळा क्र. १ व २ मध्ये आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत ४ गोदामे जळून खाक झाली. या गोदामांत मंडपाचे सामान, सजावटीसाठी लागणाऱ्या कापडाच्या झालरी, शोभेच्या विविध फायबर व प्लास्टीकच्या वस्तू तसेच महिलांची सौंदर्य प्रसाधने साठविलेली होती. आग लागल्याचे समजताच भिवंडी,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ व ठाणे मनपाच्या अग्निशामक दलाने धाव घेतली.अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने दोन तासात आग आटोक्यात आली. तर आग शांत करण्यास चार तास लागले. उन्हाच्या तपमानाने सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तूंना आग लागल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आाहे. तर काहींनी व्यावसायीक वैरभावनेतून आग लावल्याचा अंदाज केला जात आहे. गोदाम क्षेत्रात आग विझविण्याचे साधन सामुग्री नसल्याने ताबडतोब आग विझविली जात नाही. त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांची वाट पहावी लागते.तोपर्यंत लागलेल्या आगीत आजूबाजूच्या गोदामांचा बळी जात असल्याचे आजवरच्या घटनांमधून दिसून आले आहे. मात्र याबाबत शासन पातळीवरून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी काल्हेरच्या आगीची नोंद जळीत नोंदीच्या रजीस्टरमध्ये केली आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग