शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याची पिस्टल चोरणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:46 IST

पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलमधील डिक्कीतून सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांची पिस्टल चोरणाºया महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोरटयासह चौघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी सोडून आता सन्मार्गाला लागलो असून मला चांगली नोकरी मिळवून द्या, अशी विनवणीही याच पोलीस अधिकाºयाकडे महेंद्रने काही दिवसांपूर्वी केली होती.

ठळक मुद्देचोरी करणे सोडल्याचा केला होता दावाज्या अधिका-याकडे नोकरीची मागणी केली त्याचेच पिस्टल लांबविले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आता चोरी करणे सोडले असून मला नोकरीला लावा. मी ती चांगल्या प्रकारे करेन, असा दावा करणा-या महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोराने साथीदारांच्या मदतीने कापूरबावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांचे शासकीय पिस्टल शनिवारी रात्री चोरले होते. महेंद्र याच्यासह चौघांनाही रविवारी दुपारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टलही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वंजारे यांना ३ जानेवारी रोजी ठाणे पोलीस मुख्यालय येथे स्ट्राँग कैदी पार्टीची ड्युटी दिली होती. त्यांची ड्युटी ठाणे मध्यवर्ती कारागृह याठिकाणी असल्यामुळे ते मोटारसायकलने त्याठिकाणी गेले. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर ठाणे कारागृह येथून ते साध्या गणवेशात पोलीस ठाण्याकडे निघाले. त्यावेळी मोटारसायकलच्या डिक्कीमध्येच त्यांनी त्यांचा शासकीय गणवेश आणि रिव्हॉल्व्हर ठेवले होते. पोलीस ठाण्याचे कामकाज संपल्यानंतर मोटारसायकल पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभी करून ते रात्री १० वाजता कल्याण येथील आपल्या घरी गेले. पुन्हा ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कापूरबावडी पोलीस ठाण्यात ते आले. त्यावेळी मोटारसायकलच्या डिक्कीमधील गणवेश त्यांनी काढला. मात्र, त्यांचे नऊ एमएमचे शासकीय पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे चोरीस गेल्याचे आढळले. डिक्कीचे लॉक बनावट चावीने उघडून या पिस्टलची चोरी झाल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांनी तातडीने आपल्याच पोलीस ठाण्यात पिस्टल आणि काडतुसे चोरीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, राजेंद्र तोरडमल, पोलीस हवालदार राजू मोरे आणि संतोष गुरव आदींच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्येच माजिवडा परिसरातून महेंद्र दुधनव (२३), भीमराज मलिंगे (१९) आणि त्यांचे अन्य दोन अल्पवयीन साथीदार अशा चौघांना ५ जानेवारी रोजी दुपारी ताब्यात घेतले. महेंद्र आणि भीमराज हे दोघेही पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी उकळण्यासाठी तसेच जबरी चोरीसाठी त्यांना पिस्टलची गरज होती. यातूनच त्यांनी हे चोरीचे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.नोकरीसाठी केली होती याचनामहेंद्रसह चौघेही आरोपी हे माजिवडा भागातील साईनाथनगर येथील रहिवासी आहेत. महेंद्र याला एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात कापूरबावडी पोलिसांनी महिनाभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर, त्याने आपण आता चोरी करणे सोडल्याचा दावा करीत सहायक पोलीस निरीक्षक वंजारे यांच्याकडे नोकरीसाठी काही दिवसांपूर्वी याचना केली होती. त्यासाठी तो त्यांच्याकडे वारंवार फे-या मारीत होता. नंतर, मात्र त्याने त्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पिस्टल चोरण्याचे धाडस केले. सुदैवाने पोलिसांच्या अन्य एका पथकाने या पिस्टलचा तपास लावल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी