शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चरसची तस्करी करणारी चौकडी जेरबंद : १८ लाखांचे चरस हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:34 IST

ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे काश्मीरच्या महमंद मकबूल भटसह चौघांना ठाणे पोलिसांनी पकडले.

ठळक मुद्देठाणे रेल्वे स्थानक परिसरात होती तस्करीची ‘डील’अमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाईचरस घेणारेही झाले चतुर्भूज

ठाणे : चरसची तस्करी करणाऱ्या ईश्वरचंद अग्रवाल (५३, रा. दिल्ली), महमंद मकबूल भट (६७, रा. पुलमावा, जम्मू-काश्मीर), मोहसीन खान (३३, रा. कल्याण) आणि महंमद हारुण शेख (३६, रा. कल्याण) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख २० हजारांचे नऊ किलो १०० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे.ठाणे रेल्वेस्थानक परिसरात चरसच्या तस्करीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. तिच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोडसे, उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने बुधवारी (२१ मार्च रोजी) रात्री ठाण्याच्या सिडको बसथांब्याच्या परिसरात सापळा लावला होता. खबºयाच्या माहितीनुसार त्याठिकाणी आलेल्या ईश्वरचंद अग्रवाल आणि महंमद मकबूल भट या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ किलो १०० ग्रॅम चरसही हस्तगत केले. चरसच्या खरेदीसाठी आलेल्या मोहसीन खान आणि महमंद हारुण शेख या अन्य दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.आंतरराष्टÑीय बाजारपेठेत या चरसची करोडोंच्या घरात किंमत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बेकायदेशीरपणे चरसची विक्री केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुताराच्या कामातून चरसची तस्करीमहंमद मकबूल भट हा मूळचा काश्मीरचा असला, तरी तो गेल्या १० वर्षांपासून दिल्लीत वास्तव्याला आहे. तो सुताराचे काम करताकरता नकळत चरस तस्करीचाही ‘उद्योग’ करू लागला. त्याने काश्मीरमधून अग्रवालच्या मदतीने हे चरस ठाण्यात आणले. त्याने याआधीही नाशिकमध्ये चरसची तस्करी केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रतिकिलो दोन लाख रुपये दराने त्याची ते कल्याणच्या दोघांना विक्री करणार होते, त्याच वेळी ठाणे पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

ऋङ्म४१ ँं२ँ्र२ँ २े४ॅॅ’ी१२ ं११ी२३ी ्रिल्ल ळँंल्ली: १ि४ॅ ६ङ्म१३ँ १४स्रीी२ 18 ’ं‘ँ२ २ी्र९ी ि

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाDrugsअमली पदार्थ