शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली साडेचार लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:49 IST

नौदलातून निवृत्त झालो असून आता आपण पत्रकार आहे. त्यामुळे चांगल्या ओळखी असल्याने ठाण्यातील नामांकित शाळेत मुलाचे अ‍ॅडमिशन करुन देतो, असे सांगत साडे चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांद्रा येथील प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपत्रकार असल्याची केली बतावणीपैसे परत न करता केली दमदाटी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘तुमच्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देतो’, अशी बतावणी करून सुमारे साडेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील प्रकाश लक्ष्मण गायकवाड (४७) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्याचे वर्तकनगर, नवीन म्हाडा वसाहत येथील रहिवासी संदीप शिराळ यांची बांद्रा येथील गायकवाड याच्याशी काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. आपल्या मुलाला ठाण्यातील एका चांगल्या शाळेत ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याचे गायकवाड याला सांगितले होते. दरम्यान, आपण नौदलामध्ये राजीनामा दिला असून आता पत्रकार म्हणून काम करीत असल्याचे सांगून आपली चांगल्या शाळांच्या व्यवस्थापनाबरोबर ओळख असल्याची बतावणी त्याने केली होती. त्यामुळे तुमच्या मुलाचे चांगल्या शाळेत प्रवेशाचे काम मी खात्रीने करून देतो, असे सांगून त्याने शिराळ यांचा विश्वास संपादन केला. नंतर, त्यापोटी २८ जानेवारी २०१९ रोजी दोन लाख ८० हजार रुपये घेतले. तसेच ९ मार्च २०१९ रोजी एक लाख ७० हजार रुपये अशी एकूण चार लाख ५० हजारांची रक्कम त्यांच्याकडून घेतली. मात्र, त्यांच्या मुलाचा कोणत्याही शाळेत त्याने प्रवेश मिळवून दिला नाही. शाळेचा प्रवेश किंवा साडेचार लाखांच्या रकमेबाबत त्यांनी वारंवार विचारणा करूनही तो टाळाटाळ करीत होता. तेव्हा शिराळ यांनी त्याला साडेचार लाखांची रक्कम परत करण्यास सांगितले. तेव्हा गायकवाड याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटीही केली. या प्रकाराला कंटाळून शिराळ यांनी अखेर याप्रकरणी ११ आॅक्टोबर २०१९ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक ए.बी. जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी