शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी मनसेची पायाभरणी, डोंबिवलीची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:23 IST

मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला.

कल्याण : मुंबई महापालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीचा दौरा केला. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीच्या निवडणुकांची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी डोंबिवलीतील पक्ष कार्यकारिणी ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, कल्याणचा निर्णय राखून ठेवला. पक्षाची कोअर कमिटी २ नोव्हेंबरला कल्याणमध्ये पदाधिकाºयांशी संवाद साधेल. त्यानंतर, कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे शनिवारी कल्याणमध्ये झालेल्या बैठकीत उघड झाले आहे.पश्चिमेतील ‘स्प्रिंग टाइम’ येथे मनसेच्या कल्याणमधील नगरसेवक, पदाधिकारी व विभागपातळीवरील कार्यकर्त्यांशी ठाकरे यांनी चर्चा केली. या वेळी वरिष्ठ आंदोलन करताना तुम्हाला त्याची सूचना देतात का, विश्वासात घेतात का, असे प्रश्न विचारून त्यांच्याकडून काही माहिती घेतली. त्यानंतर, ठाकरे यांनी कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि सचिव महेश मोरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी प्रत्येक प्रभागात इच्छुक असलेल्या विभागाध्यक्षांच्या नावांची यादी पदाधिकाºयांनी ठाकरे यांना दिली आहे. या यादीवर ठाकरे यांनी निर्णय घेतला नाही. त्यासाठी पक्षाची कोअर कमिटी २ नोव्हेंबरला कल्याणमध्ये येणार आहे. त्यानंतर, आठवडाभरात कल्याणची कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.कल्याण ग्रामीण व डोंबिवली विधानसभा जिल्हाध्यक्षपदी प्रकाश भोईर यांची नियुक्ती झाली आहे. भोईर हे मनसेचे नगरसेवक व महापालिकेत पक्षाचे गटनेते आहेत. महिला जिल्हाध्यक्षपदी दीपिका पेडणेकर यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा संघटकपदी राहुल कामत व हर्षद पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपजिल्हा संघटकपदी माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक व शरद गंभीरराव यांची नियुक्ती केली आहे. माजी नगरसेवक राजन मराठे, राहुल चितळे व प्राजक्त पोतदार यांच्यावर शहर संघटकपदाची जबाबदारी दिली आहे. डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांना कायम ठेवले आहे. उपविभाग आणि शाखाध्यक्ष आदींच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.राज यांनी घेतले गणपतीचे दर्शनडोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांनी गणेशाचे दर्शन घेतले. या वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.गणेश मंदिर संस्थानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व आहे. या संस्थानाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सदस्यपदी मनसेचे मंदार हबळे निवडून आले. मंदिर संस्थानामध्ये त्यांच्या रूपाने मनसेचा चंचूप्रवेश झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांचे गणेश दर्शन महत्त्वाचे मानले गेले.ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या दौºयात त्यांचा मुलगा अमितही होता. ठाकरे हे कशा प्रकारे संवाद साधतात, काय बोलतात, आयुक्तांच्या दालनात काय चर्चा होते, याचे त्याने बारीक निरीक्षण केले. मात्र, तो राज यांच्यासमोर बसला नाही. उभे राहून एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे सगळे समजून घेतले. त्याच्या उपस्थितीनेही मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. अमित ठाकरे सोबतही काही जणांनी सेल्फी काढली.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेdombivaliडोंबिवली