शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

By जितेंद्र कालेकर | Updated: January 5, 2025 19:51 IST

ठाण्यातील आनंदाश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.

ठाणे - गेल्या अडीच वर्षात राज्यात जी विकासकामे झाली, त्याच विकासकामांना लाेकांनी पसंती दिली. त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिक्कामाेर्तब केले. विधानसभा निवडणूकीत महायुतीचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आले. यातूनच जनतेने विराेधकांची ताेंडे बंद केली. त्यांना कायमचे घरी बसविले. त्यामुळेच उद्धव सेनेचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भाेईर यांच्यासह अनेकांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

ठाण्यातील आनंदआश्रम या टेंभी नाक्यावरील शिवसेना कार्यालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यावेळी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, आनंद दिघे आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन आपली शिवसेना पुढे जात आहे. ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतील निकालावरुनही स्पष्ट झाले. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर जनतेच्या न्यायालयाने शिक्कामाेर्तब केले. त्यामुळेच प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातून लाेक येत असल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.

तसेच केलेल्या विकास कामांमुळेच प्रत्येक जिल्हयातून आणि तालुक्यातून शिवसेना वाढीसाठी हे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयाेग आणि न्यायालय यांनाही दाेष देणाऱ्या विराेधकांनाच कायमचे घरी बसविण्याचे काम जनतेने केल्याचेही ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षात जी लाेकहिताची कामे झाली त्याचीच लाेकांनी नाेंद घेतली. त्यामुळेच प्रत्येक जिल्हा तालुक्यातून शिवसैनिक येत आहेत या सर्वांचे आपण मनापासून स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वीच सांगितलं होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू. नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत. आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे सर्वजण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यांनी केला शिंदे सेनेत पक्ष प्रवेशयावेळी नवी मुंबईतील उद्धव सेनेचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भाेईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, मेघाली राऊत , शाखाप्रमुख, अनेक विभागप्रमख तसेच पालघरच्या माजी नगराध्यक्षा प्रियंका पाटील, धुळयाचे सह संपर्कप्रमुख हिरालाल माळी हे अनेक पदाधिकारी यांच्यासह त्याच मुरबाड आणि नाशिकच्या कार्यकर्त्यांनी यावेळी माेठया संख्येने शिंदे प्रवेश केला. शिवसेना ही सर्व सामान्य माणसांना न्याय देणारी संघटना आहे. त्यामुळेच धनुष्यबाणावर ५७ तर महायुतीमधून २३२ उमेदवार निवडून आल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे