उल्हासनगर : काँग्रेस पक्षाच्या माजी उपमहापौर जया साधवानी यांनी समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी शिंदेसेनेत प्रवेश घेतला. साधवानी यांच्या प्रवेशाने पक्षाला ऐक महिला नेत्या मिळाल्या असून महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या पर्यंत्नाला यश आल्याचे बोलले जाते.
उल्हासनगर महापालिकेच्या माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी असलेल्या जया साधवानी काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते. रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई येथे समर्थकासह शिंदेसेनेत प्रवेश घेतला. यामध्ये त्यांचे पती व माजी नगरसेवक मोहन साधवानी यांचा समावेश आहे. शहरात शिवसेना उद्धवसेने नंतर काँग्रेसला गळती लागेल्याचे बोलले जाते. साधवानी यांनी उपमहापौर असताना स्वतःचा व पक्षाचा ठसा शहरांत उमटविला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री व जया साधवानी हे राजकीय हाडवैरी असून दोघेही एकाच प्रभागात राहायला येत असल्याने, तिकीट वाटपावरून दोघात संघर्ष अटक असल्यासाजे बोलले जाते. मात्र गंगोत्री यांनी महायुतीची ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसचे शहरजिल्ह्याध्यक्ष रोहित साळवे यांनी मात्र पक्षाचे काम शेवटच्या कार्यकर्त्यां प्रयत्न सुरु आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे भाकीत साळवे यांनी केले. तर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी साधवानीसह समर्थक पक्षात येण्यासाठी प्रयत्न केले. साधवानी यांच्यामुळे पक्षाला प्रबळ महिला नेता मिळाल्याचे चौधरी म्हणाले.