शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

अंबरनाथच्या माजी उपनगराध्यक्षांचा बदलापूरमध्ये उपचारांअभावी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 18:09 IST

अंबरनाथ नगरपालिकेची पुनर्स्थापना झाल्यावर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून काम सांभाळणाऱ्या अभ्यासू नगरसेवक प्रदीप खानविलकर यांचा सोमवारी मृत्यू झाला

बदलापूर - अंबरनाथ नगरपालिकेतील पहिले उपनगराध्यक्ष प्रदीप खानविलकर यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांच्या मृत्यू ओढवला आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र चाचणीचा अहवाल न आल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास विलंब झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री बदलापुरात घडला आहे.        अंबरनाथ नगरपालिकेची पुनर्स्थापना झाल्यावर पहिले उपनगराध्यक्ष म्हणून काम सांभाळणाऱ्या अभ्यासु नगरसेवक प्रदीप खानविलकर यांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभर खानविलकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांची पालिकेमार्फत कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ते बदलापूरला आपल्या घरी निघून गेले. सायंकाळी पुन्हा त्यांना त्रास जाणवल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते.  मात्र कोरोनाचा अहवाल नसल्याने कोणतेच रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार नव्हते, त्यातच त्यांच्या घरी मृत्यू झाला.खानविलकर यांच्यासोबत सोमवारी दिवसभर अंबरनाथ मधील उपशहर प्रमुख बाळा राऊत हेदेखील उपचारासाठी भटकंती करीत होते. खानविलकर यांचा कोरोना टेस्ट अहवाल न आल्याने त्यांना कोणत्याच रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले आणि आराम करण्याचा सल्ला देण्यात आला. सायंकाळी पुन्हा त्रास सुरू झाल्यावर खानविलकर यांनी रुग्णालयात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेस देखील कोरोना चा अहवाल आड आल्याने ते घरीच बसून राहिले आणि त्याच दरम्यान त्यांच्या घरात मृत्यूशी झुंज सुरू झाला. घरात हृदयविकाराचा झटका आल्यासारखा वाटल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. खानविलकर यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला की कोरोनामुळे झाला ही बाब गौण असली तरी त्यांची इच्छा असताना देखील त्यांना रुग्णालयात उपचार मिळू शकला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अंबरनाथ मध्ये या 2 दिवसात उपचार न मिळाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोणा चे लक्षण असलेल्या परंतु कोरोना टेस्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांनी शहरात सस्पेक्टेड रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूरthaneठाणे