शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:45 IST

सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी तसेच त्या उघड करण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी अलीकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे ग्रामीण पोलिसांनी सोनसाखळी चोरटयांना पकडण्यासाठी मोक्यांच्या ठिकाणांवर व्यूहरचना केली आहे.

ठळक मुद्देमीरा रोडसह भाईंदर विभागात विशेष पथकेपालघर, ठाणे आणि मुंबईतील चोरट्यांचेही रेकॉर्ड तयारतीन वर्षांमध्ये सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल

जितेंद्र कालेकरठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर व्यूहरचना केली आहे. मीरा रोड आणि भाईंदर या परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण अधिक असल्याने या भागात गस्तीचे प्रमाण वाढविल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोनसाखळी चो-या रोखण्यासाठी तसेच त्या उघड करण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी अलीकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. या बैठकीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये पालघर आणि ठाणे ग्रामीण भागात झालेल्या सोनसाखळीच्या जबरी चोºया तसेच खुनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला होता.याच पार्श्वभूमीवर गणेशपुरी, शहापूर, मुरबाड, भाईंदर आणि मीरा रोड या पाच विभागांतील १७ पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचाही आढावा ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही नुकताच घेतला. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यासाठी ही व्यूहरचना केली आहे. यानुसार, शहापूर आणि मुरबाड विभागासाठी पोलीस उपनिरीक्षक सुळे आणि पाच कर्मचारी यांचे एक पथक तसेच भाईंदर विभागात पोलीस उपनिरीक्षक चेतन पाटील आणि पाच कर्मचारी यांचे एक पथक तर मीरा रोड विभागात सहायक पोलीस निरीक्षक विलास कुटे यांचे एक पथक तैनात केले आहे.* साध्या वेशातील पोलिसांची गस्तसोनसाखळी जबरी चोरी होणारी मोक्याची ठिकाणे आणि वेळा लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्यात्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही यासाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे.* रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही यादी तयारठाणे ग्रामीणच्या सीमेवर असलेल्या ठाणे शहर, पालघर आणि मुंबई शहर या परिसरात वारंवार सोनसाखळी जबरी चोरी करताना पकडलेल्या कुख्यात आरोपींचीही यादी तयार केली आहे. त्या यादीनुसारही सीसीटीव्ही तसेच खब-यांच्या मदतीने या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारेही संशयितांची माहिती ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर पोलिसांमध्ये वितरित केली जात आहे. त्याआधारेही गुन्हेगारांना पकडण्याची व्यूहरचना केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीणमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले असून २९ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. या सर्वच गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस