शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
4
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
5
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
7
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
8
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
9
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
11
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
12
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
13
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
14
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
15
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
16
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
17
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
18
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
19
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
20
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी

वणव्यामुळे वनसंपदेचा -हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:26 IST

मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

दासगांव : मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने वणवे लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लागणाऱ्या वणव्यांतून आगीच्या ज्वालांनी वातावरण आणखीनच तापले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच पशू-पक्ष्यांवर होत असून, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपासून दासगाव डोंगर भागात लागलेल्या वणव्यामुळे परिसरात उष्णतेत वाढ झाली आहे. हा वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.कोकणातील बहुतांश गावे ही डोंगर कुशीमध्ये वसलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील वनसंपत्तीमुळे कोकणातील तापमान कायम कमी किंवा थंड राहिलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यामुळे कोकणातील तापमानाचा पाढा दिवसेंदिवस वाढू लागलेला दिसून येत आहे. त्यातच शेतकºयांच्या गैरसमजुतीतून आणि नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.एकीकडे शेतकरी परंपरागत पद्धतीतून भातशेती करण्यासाठी जंगलातील झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून तरवा भाजण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा ºहास आणि वातावरणावरील परिणाम होत आहे. पूर्वीपासूनच्या डोंगरांना वणवा लावून गवत जाळण्याचे प्रमाणदेखील आजही कायम आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच विविध ठिकाणी डोंगरात आगीचे लोट उठताना दिसतात.शासकीय पातळीवर वणवा आणि तरवा भाजणीबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी वारंवार लागणारे वणव्यांचे प्रकार बघता शेतकºयांनी परंपरागत शेतीत बदल केला नसल्याचेच दिसून येत आहे. नेहमीच अशाच प्रकारे वणवा लागल्याने सध्या असलेल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात असे वणवे लागण्याचे प्रकार होत आहेत. दासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी महामार्गालगतच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. त्यात संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.