शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आगीच्या १८४ घटनांमध्ये वनसंपदा जळून खाक; जंगल वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 00:35 IST

शहापूर तालुक्यातील चित्र : नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत

जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुका जसा डोंगरदऱ्या असणारा तसाच तो जंगलांनी भरलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जंगलांना  लागणाऱ्या वणव्यामुळे ही वनसंपदा आता धोक्यात आली असून ती वाचविण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक वनौषधी असून शिकारीच्या हेतूने वा अनावधानाने लागलेल्या आगीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे ही संपदा आता धोक्यात आली आहे. गेल्या ‌‌‌वर्षभरात १८४ घटनांमध्ये वनसंपदा खाक झाली आहे.

कसारा, वाशाळा, डोळखांब, वासिंद, शहापूर या सर्वच परिसरात दररोज वणवे लावले जात असून यामुळे मोठमोठी झाडे पेटल्याने उन्मळून पडत आहेत. शिकारीच्या उद्देशाने तर काही जंगले तस्करीच्या उद्देशाने तर अगदी बोटावर मोजण्याइतकेच वणवे नैसर्गिक आपत्तीतून निर्माण होत आहेत. मात्र हे वणवे विझविण्यासाठी गावकरी पुढे येताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची कारणमीमांसा केल्यानंतर आज शेतीचे प्रमाण कमी झाले असून त्यासाठी लागणारे गवत लागत नसल्याने नागरिक वणवे विझविण्यासाठी पुढे येत नसल्याची बाब उघड झाली आहे. या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे.

नागरिकांनी वणवे विझविण्यासाठी वनविभागाला सहकार्य करण्याकरिता व वने किती महत्वाची आहेत, त्यांचे संगोपन व संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी कीर्तनाची जोड दिली जात असून गाव परिसरात जनजागृती केली जात आहे. त्यासाठी  उपवनसंरक्षक वसंत घुले, प्रकाश चौधरी, प्रियांका उबाळे, संदीप तोरडमल, प्रशांत निकाळजे, मयूर बोठे व वन क्षेत्रपाल  जयवंत फर्डे  प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :fireआग