शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाने अडवले पाड्यांचे पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:34 IST

अजित मांडके  लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ...

अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली या आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे कार्यादेश ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले. परंतु या कामासाठी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हे पाडे तहानलेले राहणार आहेत. येथील पाणीपुरवठ्याचे काम दोन वर्षांपासून रखडल्याचे जळजळीत वास्तव ‘लोकमत’ने अलीकडेच उघड केले. 

घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगरमाथ्यावर जाऊन अरुंद वाटा तुडवत पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’ने उजेडात आणले. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेतली. माजी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात या भागाची तहान भागविण्यासाठी ८८ लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर केली होती. केवळ त्याचे कार्यादेश देण्याचे काम शिल्लक होते. 

नेमका अडसर कोणता?खरा अडसर पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी पाड्यांचा आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित येतो. या भागात काम करता येत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही वनविभागाकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला होता. आता पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. परंतु अद्याप त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आदिवासी पाड्यांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.  ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, पाणीपुरवठा विभागाने या कामाचे कार्यादेश दिले होते. खालील बाजूस असलेल्या पाड्यांवर काम सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली होती. 

संबंधित ठेकेदाराला कामाचे कार्यादेश दिले. तसेच वनविभागाकडे पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्याकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.विनोद पवार, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई