ठाणे: येथील राम मारुती रोड परिसरातील एका गटाराच्या लोखंडी जाळीमध्ये जयश्री रेमडे (५४) या महिलेचा पाय अडकल्यामुळे तिच्यासह स्थानिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या मदतीमुळे तिची या जाळीतून अखेर सुटका झाली आणि तिने सुटकेचा नि:श्वास सोडला.तीन हात नाका येथील ‘दिपज्योती’ सोसायटीमध्ये राहणा-या जयश्री या आपल्या पतीसमवेत सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे स्टेशनकडे जात होत्या. त्याचवेळी राममारुती रोडवरील ‘राजमाता वडापाव’या दुकानासमोरील एका गटाराच्या चेंबरवरील लोखंडी जाळीत त्यांचा डावा पाय अडकला. हा पाय तसाच गटारात गेल्याने त्या अर्धवटपणे खाली पडल्या. पाय बाहेरच निघत नसल्यामुळे त्यांनी बरीच आरडाओरड केली. प्रयत्न करुनही पाय निघत नव्हता. त्यावेळी रस्त्यावरुन जाणा-या रिना राजे या महिलेने वाहतूक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाचारण केले. तेंव्हा अर्ध्या तासाने तिथे पोहचलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची या जाळीतून सुटका केली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाला सूज आली सुदैवाने गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
ठाण्यात गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला महिलेचा पाय: तासाभराने झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:26 IST
ठाण्यातील राम मारुती रोडवरील एका गटाराच्या लोखंडी जाळीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास महिलेचा पाय अडकला होता. त्यामुळे शहरातील लोखंडी जाळयांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
ठाण्यात गटाराच्या लोखंडी जाळीत अडकला महिलेचा पाय: तासाभराने झाली सुटका
ठळक मुद्देमदतीसाठी पाऊण तासाची प्रतिक्षाबघ्यांच्या गर्दीमुळे मदतीला अडथळावाहतूक कोंडीचाही अग्निशमन दलाला फटका