शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 09:56 IST

भाजीपाला पुरवठ्यासाठी सहकार खाते सरसावले 

सुरेश लोखंडे  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ़ू नये यासाठी आपल्या  गृहनिर्माण संस्थामधील रहिवाश्यांना रास्त दरात घरपोच किराणा माल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ , अन्नधान्य मिळवून देण्यासाठी आता सहकार खाते पुढे आले आहे. जिल्ह्यातील या सोसायट्यांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा मागणीनुसार सहकार विकास महामंडळाकडून होणार्‍या  पुरवठ्याचे नियोजन ठाणे जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील,  यांनी सांगितले.         ठाणे ज़िल्हयातील गृहनिर्माण संस्थांमधील सर्व रहिवाश्यांना  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने सहकार  विकास महामंडळाद्वारे आता थेट घरपोच धान्य,भाजीपाला आणि फळे पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. यानुसार गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाश्यांनी, सभासदानी आपली मागणी नोंदताच तत्काळ  जीवनावश्यक वस्तू, भाजीपाल, अन्नधान्य पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये धान्य आणि किराणा दोन दिवसात तर ताजा भाजीपाला दुसऱ्या दिवशी घरपोच मिळणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ़ू नये यासाठी गृहनिर्माण संस्थामधील सभासदांना रास्त दरात घरपोच किराणा माल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ मिळावीत यासाठी सहकार विकास महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे.         ठाणे ज़िल्हयातील गृहनिर्माण संस्थांचा प्रत्येक रहिवासी,  सभासदानी उत्स्फूर्तपणे लाभ घेण्यासाठी आपल्या मागणीसाठी वेळीच संपर्क करणे आवश्यक आहे. याशिवाय सहकार विकास महामंडळाचे www.mcdc.com या संकेत स्थळावर मागणीीनोंदवणे गरजेचे आहे,  असे आवाहन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या संकेतस्थळावर धान्य, किराणामाल, पालेभाज्या आणि फळांची मागणी प्रत्येक रहिवाााशांना, सभासदाला नोंदविता येईल, यामध्ये समन्वय म्हणून सोसायटीचे चेअरमन किंवा सचिव काम पाहतील. प्रत्येक सोसायटीला विशिष्ट कोड क्रमांक देणार आहे. त्याचा वापर करुन सभासद मागणी नोंदवू शकतील. सहकार विभागाने सूरू क़ेलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा व योजनेचा ठाणे ज़िल्हयातील सर्व सभासद, रहिवासी मोठ्या संख्येने घेतील अशी अपेक्षा पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस