शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मनसे पाठोपाठ मराठी एकीकरण समितीने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 17:03 IST

फेरीवाला सर्वेक्षण पुन्हा करण्याची मागणी मनसे पाठोपाठ एकीकरण समितीने केली आहे.

ठळक मुद्देफेरीवाला सर्वेक्षण पुन्हा करा : मराठी एकीकरण समितीमनसेनेही याआधी केली होती मागणीकोरोनापूर्व काळात केलेले सर्वेक्षण कुचकामी

ठाणे : राज्यभरात फेरीवाला धोरणामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात एकच नियमावली अधिकृत ग्राह्य धरून, कोरोनापश्चात उपलब्ध सर्व फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण, नोंदणी व्हावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीने पालकमंत्री आणि ठाणे महापालिकेकडे केली आहे. या आधी ही मागणी मनसेने देखील केली होती.          मनसे पाठोपाठ आता फेरीवाल्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण करण्याचा मुद्दा मराठी एकीकरण समितीने उचलला आहे.  ठाणे पालिकेने मागीलवर्षी फेरीवाला सर्वेक्षण केले होते. माञ अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसून कोरोना काळात बहुतांश परप्रांतिय फेरीवाले गावाकडे परतल्याने ठाणे शहरात मराठी तरुणांना रोजगाराची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या काळातच तरुणांच्या नोकर्‍याही हातच्या गेल्याने त्यांनी भाजी, फळे, मत्स्य, जीवनावश्यक वस्तूंचे आॅनलाईन मार्केट सुरु आहे. याच तरुणांना फेरीवाला सर्वेक्षणात नव्याने सामील करुन त्यांना शहराच्या विविध भागात 'बिझनेस आॅन व्हील' या संकल्पनेनुसार रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे दोन आठवड्यांपूर्वी केली होती. नव्याने करण्यात येणाऱ्या फेरीवाला सर्वेक्षणात सन २००८ च्या शासननिर्णयानुसार ८०% स्थानीक (विशेषत: भुमिपुत्रांना) पालिकेचे अधिकृत फेरीवाले परवाने मिळावेत. परप्रांतीय फेरीवाल्यांना परवाने देताना त्यांना स्थानिक भाषा अवगत असल्याची खात्री करुन घ्यावी व स्थलांतरीतांचा कायदा, १९७९ च्या अनुषंगाने या परप्रांतीय फेरीवाल्यांची नोंदणी, चारीत्र्य पडताळणी, रहीवासविषयी कागदपत्र अनिवार्य असावीत. यामुळे फेरीवाला परवान्यांची भाडेतत्वावर विक्रीस पायबंद बसेल, अनोळखी परप्रांतीयांमुळे वाढणारी राज्यातील गुन्हेगारीतही घट होईल. स्थानीकांना रोजगार डावलल्याने निर्माण होणारा भाषीक व प्रांतीक द्वेष, तेढ कमी होईल याबाबत तातडीने पारदर्शीपणे कार्यवाही करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन मराठी एकीकरण समितीने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिका विजय सिंघल यांना दिले आहे.        कोरोनापूर्वकाळात झालेले स्थळ सर्वेक्षण व नोंदणी आता बऱ्याच अंशी कुचकामी ठरणार आहे. शिवाय, यापूर्वी झालेले सर्वेक्षण स्थानीक राजकीय नेत्यांच्या दबावाखाली व परप्रांतीय फेरीवाल्यांच्या तथाकथीत युनीयनच्या प्रभावाखाली केले होते, त्यामध्ये असंघटीत स्थानीक बेरेजगारांना न्याय मिळाला नाही, अश्या तक्रारी आहेतच. नवीन सोशल डिस्टन्सींग (साथसोवळे व अंतरसोवळे) नियमानुसार पदपाथ, रस्त्यावरील फेरीवाला पद्धत कदाचीत कायमस्वरुपी बंद करावी लागेल असे समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे