शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आरोपींसमोर पाणउतारा केल्यानेच ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल

By जितेंद्र कालेकर | Updated: August 14, 2018 22:35 IST

आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे कापूरबावडी पोलीस ठाण्यातील घटना आत्महत्येचा प्रयत्न रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

जितेंद्र कालेकरठाणे: ज्या आरोपींना अटकेचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिले होते. त्याच आरोपींसमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा त्यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, देशमुख यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना काही दिवस आरामाची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर यांनी एका प्रकरणावरुन खडसावल्याने नैराश्येपोटी देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून दरेकर यांची तातडीने ठाणे शहर नियंत्रण कक्षात बदली केली आहे. एका हाणामारीच्याप्रकरणाचा तपास देशमुख यांच्याकडे होता. चार दिवस सतत प्रयत्न करुनही त्यांना ते आरोपी मिळाले नव्हते. यावरुन दरेकर यांनी त्यांना आधीही खडसावले होते. त्यात शुक्रवारी त्यांना पीएसओ (ठाणे अंमलदार) डयूटी असतांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी कापूरबावडी पोलीस ठाण्यात हजर झाले. ते दरेकर यांच्यासमोर असतांना त्यांनी देशमुख यांना बोलावून घेतले. या आरोपींना अटक करा, असे त्यांनी आदेशदिले. पीएसओ डयूटी असल्यामुळे शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी त्यांना अटक करण्याचे सांगत त्यांना अटक करण्यास नकार दिला. यातूनच त्यांच्यात वादावादीही झाली. पीएसओ डयूटी असली तरी दिलेले आदेश अंमलात आणलेच पाहिजेत, असेही त्यांनी बजावले. त्यानंतर आरोपींसमोरच त्यांचा त्यांनी पाणउतारा केला. दरेकर यांचा पारा चढलेला असल्यामुळे त्यांनी देशमुख यांना चांगलेचफैलावर घेतले. त्यानंतरच संतापाच्या भरात देशमुख यांनी वर्तकनगर येथील घरी येऊन फिनाईल हे किटकनाशक प्राशन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............................दरेकर यांच्याविरुद्ध याआधीही तक्रारी कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर हे ३१ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये दरेकर यांची त्यांच्या जागी मुुंबईतून बदली झाली. नियुक्तीनंतर दुस-याच महिन्यात त्यांनी एका जमादाराला क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ केली होती. याबाबत त्या जमादाराने सहायक आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबतही त्यांची चौकशी झाली होती. तर अन्य एका प्रकरणात वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये, अशी नोटीसही वरिष्ठ अधिका-यांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्यही एका उपनिरीक्षक महिलेने त्यांची महिनाभरापूर्वीच सहायक आयुक्तांकडे तोंडी तक्रार केली होती. याशिवाय, काही कर्मचा-यांशी त्यांचा वाद झाल्याने त्यांनी या पोलीस ठाण्यातून अन्यत्र बदल्या करुन घेतल्याचेही काही कर्मचारी आता दबक्या आवाजात बोलत आहे. दरम्यान, दरेकर यांचा स्वभाव तापट असला तरी त्यांनी कामाचा एक भाग म्हणूनच उपनिरीक्षक देशमुख यांना आदेश दिले होते. त्यामुळे देशमुख यांनीही टोकाची भूमीका न घेता सबूरीने घ्यायला हवे होते, अशीही चर्चा या पोलीस ठाण्यातील अधिकाºयांमध्ये आहे. .......................

‘‘ एका आरोपीला अटकेच्या सूचना उपनिरीक्षक देशमुख यांना दरेकर यांनी दिल्या होत्या. पण स्टेशन हाऊस डयूटी असल्यामुळे त्यांनी नकार दिला. यातूनच दरेकर त्यांना रागावले, अशी प्राथमिक माहिती आहे. पण याप्रकरणी सखोल नि:पक्ष चौकशी उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडून करण्यात येत आहे.’’

मधुकर पांडेय, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे