शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट विदेशी मद्याची कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना शहापूरातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:20 IST

एका कारमधून बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सलग दोन दिवस पाळत ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने दोघांना मंगळवारी अटक केली. मद्यासह वाहतूकीची कारही या पथकाने त्यांच्याकडून जप्त केली आहे.

ठळक मुद्दे वाहनासह आठ लाख १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने शहापूर येथे धाड टाकून एका वाहनातून बनावट मद्याची वाहतूक करणा-या किशोर सोनावले (२९, रा. शहापूर, ठाणे) आणि गोकूळ शिरोसे (३०, रा. शहापूर) या दोघांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचे १८० मिलीचे ३० बॉक्स आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोटारकार असा आठ लाख १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण आणि अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांनी अवैध मद्य तस्करीविरुद्ध कारवाईचे आदेश ठाण्याच्या कोकण विभागीय भरारी पथकाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर शहापूरच्या लाहे परिसरात २० जानेवारी रोजी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाचे ए. डी. कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड तसेच जवान राजेंद्र शिर्के, दीपक घावटे, अविनाश जाधव आणि सदानंद जाधव आदींच्या पथकाने सापळा लावला होता. अखेर २१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास लाहे भागातून मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाºया किशोर आणि गोकूळ या दोघांना या पथकाने पकडले. त्यांच्याकडून वरील कारसह विदेशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही आरोपींची ठाणे न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.

टॅग्स :thaneठाणेExcise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड