शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाहनावरील ताबा सुटल्याने मैदा वाहक ट्रकची सिमेंटच्या ट्रकला धडक

By जितेंद्र कालेकर | Updated: December 3, 2023 18:35 IST

चालकासह आठ जखमी: नाशिक मुंबई मार्गावरील खारेगावातील घटना.

जितेेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाहनावरील ताबा सुटल्याने १२ टन मैदा वाहून नेणाऱ्या ट्रकची सिमेंट टँकरला जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मैदा वाहक ट्रकचा चालक इजाज अहमद (४०) आणि क्लिनर रशिद अब्दुल (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले. तर अन्य सहा प्रवासी हे किरकोळ जखमी झाले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये वाहन चालकासह एक प्रवास असे दोघेजण अडकले होते. या दोघांनाही सुखरुप बाहेर काढून त्यांच्यासह सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

खारेगाव टोल नाक्याच्या पुढे खारेगाव ब्रिजजवळ नाशिक - मुंबई मार्गावरुन ३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या चालक इजाज हा १२ टन मैदा मालेगाव ते मुंबई असा घेउन जात होता. त्याचदरम्यान, त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ३२ टन सिमेंट टँकरवर जोरदार आदळला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने मदतकार्य राबविले. अपघातग्रस्त ट्रकमध्ये वाहन चालकासह अमर खान (३५ , रा. अंधेरी) हे दाेघेजण अडकले होते. खान आणि इजाज या दाेघांच्याही दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तर क्लिनर रशिद अब्दुल (२६, रा. मालेगाव ) याच्या डोक्याला व पोटाला तसेच डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाल आहे. याशिवाय, मालेगाव ते अंधेरी प्रवास करणारे अमजर खान, अफसना खान (३६, रा. अंधेरी. ) जरीन खान, (७ वर्षे) ही मुलगी किरकोळ जखमी झाली. तर समीर खान ( १२, रा. अंधेरी )अब्दुल समत (२३, रा. मालेगाव ) आणि आदिल मलिक, ( २७ , रा. अंधेरी ) हे आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातग्रस्त ट्रक मध्ये अडकलेल्या वाहन चालक व प्रवासी यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मागार्वरील या वहिनीवरील वाहतूक एका मार्गिकेवरून वरून धिम्या गतीने सुरू होती.

हे अपघातग्रस्त वाहन क्रेन मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला केले आहे. अपघातामुळे रस्त्यावर आॅइल सांडलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात