शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जिल्ह्यातील नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:20 IST

काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत.

ठाणे : काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी पुन्हा जोर धरला असून दिवसभर कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आले आहेत. या पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. टिटवाळ्यानजीकच्या रुंदे गावच्या पुलावरून काळू नदीचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे १२ गावांचा संपर्क तुटला. कल्याणमधील गणेशघाट येथे अडकलेल्या दोन महिला, एक पुरुष आणि काही बकºयांची केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने सुखरुप बाहेर काढले.हवामान खात्याने सोमवार व मंगळवारी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तलाव क्षेत्रातही पावसाचा जोर असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहापूरच्या किन्हवली गावाजवळील संगमेश्वर हे प्राचीन मंदिरात काळू नदीच्या पुराचे पाणी शिरले. तेथील पुजाºयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. याच नदीचे पाणी कल्याण तालुक्यातील रुंद गावाजवळच्या पुलावरून वाहत आहे. यामुळे फळगाव, वासुंद्री आदी १२ गावांचा टिटवाळ्याशी संपर्क तुटला आहे. या काळू नदीच्या पुरामुळे मुरबाड परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्हास नदीसह ठिकठिकाणच्या नदीनाल्यांच्या पुरामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक मंदावली. माळशेज घाटातही पाऊस असून दाट धुके आहे. यामुळे घाटातील वाहतूक काही अंशी खोळंबली असून चालकांना दिवे लावून वाहन चालवण्याचा प्रसंग ओढवला आहे.भिवंडीजवळील माणकोली पुलाचे अर्धवट काम असल्यामुळे या पावसात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी झाली. चालकांना तासन्तास एकाच जागेवर उभे राहण्याचा प्रसंग ओढवला.ठाणे शहरात घोडबंदर रोडवर परिसरातील रहिवाशांना घरी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ठाणे खाडीसह नागलाबंदर, घोडबंदर खाडीत सुमारे ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा अंदाज महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने व्यक्त केल्यामुळे खाडीकिनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.ठाणे शहर परिसरात ठिकठिकाणी किरकोळ दोन आगीच्या घटना घडल्या. पाच झाडे पडली. पाणीपुरवठा करणाºया पाइपलाइनला एका ठिकाणी गळती लागली. ठाणे शहरात सकाळी ८ वाजेपासून सव्वाचार वाजेपर्यंत ५१.५८ मिमी पाऊस पडला. लोकलगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, मात्र सुटीचा दिवस असल्यामुळे फार परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उल्हासनगर शहरात ८९ मिमी, मुरबाडला ७९, अंबरनाथला ७०, कल्याणला ६३, शहापूरला ५८, ठाण्याला ३७ आणि सर्वात कमी भिवंडी तालुक्यात २५ मिमी पाऊस मागील २४ तासांच्या कालावधीत पडला.>स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौक परिसरातील मुरलीवाला कॉम्प्लेक्स इमारतीचा तिसºया मजल्याचा स्लॅब रविवारी संध्याकाळी कोसळला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर दोन मुले जखमी झाली. मुलांवर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरू असून ही इमारत रिकामी करण्यात येत आहे.भाटिया चौक परिसरात १९९५ मध्ये मुरलीवाला कॉम्प्लेक्स ही चार मजली इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील रुम नं. ३०३ चा स्लॅब दुसºया मजल्यावरील रुम नं. २०३ वर सायंकाळी कोसळला. त्यावेळी नीना भरत गनवानी या हॉलमध्ये दोन मुलांसह बसल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर स्लॅब पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांची २३ आणि १८ वर्षांची दोन मुले गंभीर जखमी झाली.महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, स्थानिक नगरसेवकांसह नायब तहसीलदार गवई यांनी घटनास्थळी धाव घेतली. नीना गनवानी यांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. शिंपी यांनी इमारत रिकामी करण्यास सुरुवात केली असून इमारतीत एकूण १६ प्लॉट, तर चार दुकाने आहेत. येथील रहिवाशांची नातेवाइकांकडे तर काहींची राहण्याची सोय महापालिका करणार असल्याची माहिती शिंपी यांनी दिली. तसेच भाटिया चौकातून कुर्ला कॅम्पकडे जाणारा एकीकडचा रस्ता बंद केला आहे.>धरणक्षेत्रात दमदारपाणीपुरवठा करणाºया धरण क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली असून मागील वर्षीच्या तुलनेत मात्र भातसा धरणात आजपर्यंत सुमारे सहा टक्के कमी साठा आहे. मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. बारवी धरणात ७० टक्के पाणीसाठा झाला. मागच्या वर्षी ६९ टक्के होता. मुंबईसह ठाण्यास पाणीपुरवठा करणाºया व सर्वाधिक मोठे जलाशय म्हणून ओळखल्या जाणाºया भातसा धरणात आज ९० मिमी पाऊस पडला असून आतापर्यंत एक हजार १३६ मिमी पाऊस या धरणात पडला. मोडकसागरमध्ये आतापर्यंत एक हजार २९१ मिमी पाऊस पडला. १६२.७२ मीटर पाण्याची पातळी असलेले हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तानसा धरणात मात्र ८०.५६ टक्के पाणीसाठा असून, आंध्रा धरणात ५३ मिमी पाऊस पडला. या धरणात ४३ टक्के पाणीसाठा तयार झाला. मागील वर्षी ४४ टक्के होता. मात्र, या उल्हास नदी खोºयातही पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे या धरणात पाणीसाठा वाढतो आहे.