शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"संजय गांधी उद्यानातून येणारे पावसाचे पाणी अडवून वापरण्यासह, मीरारोड भागातील पूरस्थिती नियंत्रणात आणणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 19:45 IST

पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते. हे पाणी शहरातून वाहत जाऊन घोडबंदर व जाफरी खाडीस मिळते.

मीरारोड - मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पूर्व भागात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगर - दऱ्यातून पावसात येणारे पाणी साठवून, त्याचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी अडवले जाऊन शहराला पूरस्थितीपासून दिलासा मिळेल, असे आमदार गीता जैन यांनी म्हटले आहे.

पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येते. हे पाणी शहरातून वाहत जाऊन घोडबंदर व जाफरी खाडीस मिळते. परंतू वन हद्दीतून वाहून येणाऱ्या पावसाळी पाण्यामुळे महाजनवाडी, लक्ष्मीबाग, आदी काशीमीरा महामार्गा लगतचा परिसर तसेच हटकेश, सिल्व्हर सरिता, मीरागाव, अमिश पार्क, कृष्णस्थळ, विनय नगर, सिल्व्हर पार्क - विजयंपार्क आदी निवासी क्षेत्राला दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. यामुळे लोकांचे प्रचंड हाल व नुकसान होत असते. 

राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारे पावसाचे पाणी वन हद्दीच्या परिसरात साठवून ठेवल्यास त्या पाण्याचा शहरातील नागरिकांसाठी वापर होऊ शकेल व नागरी वस्तीत उद्भवणारी पूरस्थिती नियंत्रणात येईल त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत सर्वेक्षण करून पावसाळी पाणी साठवण्यासाठी ५ ठिकाणे निवडण्यात आली. 

परंतु, सदर कामास विलंब होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्याआधी कामे पूर्ण व्हावीत यासाठी आ. जैन यांच्या विनंतीवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली होती. ठाकरे यांनी वन आदी विभागाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थळपाहणी करून तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले होते.

त्यानुसार शुक्रवारी आ. जैन सह राष्ट्रीय उद्यानाचे संचालक  मल्लिकार्जुन, महानगरपालिकेचे शहर अभियंता व अधिकारी, नगरसेवक अश्विन कासोदरिया व परशुराम म्हात्रे आदीनी महापालिकेने सुचविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या जागांची पहाणी केली. त्यात वाघेश्वरी मंदिराच्यामागे सर्व्हे क्र. २०६ येथील जागेची निवड करण्यावर एकमत झाले. या जागेचा प्रस्ताव तयार करून राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक विभागाकडे देण्यात यावा असे आ. जैन यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.  

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक