शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांची पुन्हा आवराआवर; शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:20 IST

पुराचा दोनवेळा फटका, नागरिक अजूनही भीतीच्या छायेत

बदलापूर : २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने शेकडो कुटुंबे बाधित झाली. पूर ओसरल्यावर त्यांनी आपल्या घरांची आणि सामानांची आवराआवर सुरू केली. यातून सावरून आठवडाही उलटत नाही, तोच रविवारी बदलापूरला पुन्हा पुराचा जोरदार फटका बसला. जी कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झाली होती, त्यांना पुन्हा एकदा फटका बसल्याने आता त्यांचा धीर खचला आहे. तरीसुद्धा दु:ख बाजूला सारून पूरग्रस्त कुटुंबांनी पुन्हा आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे.२६ आणि २७ जुलैच्या पुराचा फटका सहन केल्यावर त्याच कुटुंबांवर ४ आॅगस्टच्या पुराचा फटका सहन करण्याची वेळ पुन्हा आली आहे. रविवारी पहाटेपासून पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त सावध झाले होते. मात्र, पुन्हा घरात पाणी भरेल, असे वाटले नव्हते. मात्र, उल्हास नदीने पुन्हा आपले रौद्ररूप दाखवत पूरग्रस्तांची धास्ती वाढवली आहे. रविवारी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर पुन्हा एकदा घर आवरण्यात ही कुटुंबे व्यस्त झाली होती. पहिल्या पुरात बाधित झाल्यानंतर नागरिकांना आलेल्या मदतीचे साहित्यदेखील रविवारच्या पुरात वाहून गेले. हेंदे्रपाडा, यादवनगर भागातील नागरिकांना दोन दिवस आधीच जे जीवनावश्यक साहित्य मिळाले होते, ते साहित्यही रविवारच्या पुरात भिजले. त्यामुळे अन्नधान्याची गरज नव्याने निर्माण झाली आहे. आधीच भिजलेले दुकानातील सामान फेकले असताना, या दुकानदारांनाही दुसऱ्यांदा पुराचा फटका सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पूरग्रस्तांची आवराआवर सुरू होती. पूर ओसरत आला असला तरी, अजूनही बदलापूरचा धोका कमी झालेला नाही.पूर ओसरला; पंचनामे सुरूभिवंडी : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बाधित नागरिकांच्या मालमत्तेचा महापालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात तहसीदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. घरे, जनावरे वाहून गेली असतील अथवा मनुष्यहानी झालेल्या नागरिकांच्या पंचनाम्यांना प्राधान्य दिले जात आहे. नुकसानीचा आकडा निश्चित होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. त्यानंतर, अहवालानुसार शासकीय मदत पूरग्रस्तांना दिली जाईल, अशी माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.तीनबत्ती चौक, ईदगाह रोड, बाजारपेठ, शिवाजी चौक, शिवाजीनगर, नवीचाळ, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला, अंबिकानगर, पद्मानगर या भागात पाणी साचल्याने अनेक नागरिकांची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती सामानासह मालाचे मोठे नुकसान झाले आहे, तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अन्नधान्यासह कपडे, भांडी व किमती वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी नुकसान झालेल्या लोकांच्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याने सकाळपासून महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

टॅग्स :floodपूर