शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा २०२० : कोरोनामुळे ठामपाची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST

Thane : शेवटच्या टप्प्यात महापालिकेला मालमत्ता आणि पाणीकर वसुलीमुळे थोडासा दिलासा मिळाला.

- अजित मांडकेठाणे :  महापालिकेसाठी सरते वर्ष फारसे चांगले नव्हते. प्रारंभीच तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल आणि अधिकाऱ्यांच्या वादामुळे त्यांनी सक्तीची रजा घेतली. त्यानंतर, अर्थसंकल्पातूनही ठाणेकरांच्या पदरी निराशाच आली. त्याउलट पालिकेच्या खांद्यावर तब्बल तीन हजार ३०० कोटींचे दायित्व आले. त्यानंतर, आलेल्या कोरोनामुळे आर्थिक घडी पुरती विस्कटली. ठेकेदारांची बिले रखडल्याने अनेक प्रकल्पांवर त्याचा परिणाम झाला. जो काही निधी होता, त्यातून कोविड सेंटर उभारणी करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात महापालिकेला मालमत्ता आणि पाणीकर वसुलीमुळे थोडासा दिलासा मिळाला.

अर्थसंकल्पातून घोर निराशाअर्थसंकल्पातून ठाणेकरांना नवीन काहीच मिळाले नाही. तीन हजार ७८० कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये करवाढ नसली तरी अर्थसंकल्प तुटीचा आणि तीन हजार ३०० कोटी दायित्वाचा ठरला. वर्ष सरत आल्यानंतर आता कुठे या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी झालेली दिसत आहे.

तीन महिन्यांत आले दोन आयुक्तकोरोनाची सुरुवात होण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार सोडला होता. मार्च महिन्यात विजय सिंघल यांची नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ फारसा गाजला नाही. तीन महिन्यांत त्यांच्या जागेवर डॉ. विपिन शर्मा यांची नियुक्ती झाली.

पदोन्नती दिलेले अधिकारी आले मूळ पदावर तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बढती आणि पदोन्नती देण्याची घाई केली होती. परंतु, त्यानंतर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे कार्यभार काढून त्यांना मूळ पदावर आणण्याचे काम वर्षाच्या शेवटी केले.

वाढीव पाण्यासाठी स्टेमबरोबर खडाजंगीठाणेकरांना या काळातही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे स्टेमकडून वाढीव पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, मागील महिन्यात झालेल्या बैठकीनंतर ठाणेकरांना वाढीव १० एमएलडी पाण्याचा वाढीव साठा मिळू लागला आहे. त्यामुळे ठाण्याला दिलासा मिळाला आहे.

तिजोरी झाली रितीलॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ठेकेदारांची बिले रखडल्याने विकासकामांवर परिणाम झाला. या कालावधीत तिजोरीच रिती झाली होती. जो निधी शिल्लक होता, तोदेखील कोरोनासाठी वापरण्यात आला. राज्य शासनाला कोरोनासाठी २५० कोटींची मागणी केली. परंतु, जेमतेम ५० ते ६० कोटीच मिळाले. त्यातही कोरोनाचा काळ असल्याने मालमत्ता आणि पाणीकर माफ करावे, अशी मागणी राजकीय मंडळींनी केली. परंतु, ती मान्य झाली नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका