शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोचा फिजीबीलीटी अहवाल पुढील आठवड्यात होणार सादर, अवघ्यात तीन महिन्यात अहवाल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 3:44 PM

ठाणे महापालिकेचा बुहर्चचीत असलेला अंतर्गत मेट्रोचा फिजीबीलीट अहवाल अवघ्या तीन महिन्यात पालिकेच्या हाती पडणार आहे. या अहवालानुसार अंतर्गत मेट्रो किफायतशीर आहे अथवा नाही, याची माहिती कळणार आहे.

ठळक मुद्देअहवाल महासभेच्या पटलावर ठेवण्याच्या तयारीत प्रशासनप्रस्तावित नव्या रेल्वे स्थानकालाही जोडली जाणार

ठाणे - भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो ठाणेकर पाहण्याआधीच अंतर्गत मेट्रोचा आनंद मात्र ठाणेकर मंडळी आधीच घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या फीजीबीलीटी अहवालासाठी वर्षभराचा कालावधी जातो तो अहवाल अवघ्या तीन महिन्यात तयार झाला असून तो पुढील आठवड्यात महामेट्रो मार्फत पालिकेला सादर केला जाणार आहे. त्यानुसार अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीकोणातून ठाणेकरांना या अंतर्गत मेट्रोचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प लाईट रेल ट्रान्झीट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. याचा फायदा वागळे, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांसाठी होणार आहे.          ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर ( हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट) चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंग रुट पध्दतीने या मार्गावरुन प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रुट्ससाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. तर सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनीवर अतिक्र मण आहे. शिवाय काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी नक्की कोणते साधन योग्य ठरणार याचा निर्णय झाल्यानंतर या मार्गावर काम करणे महापालिकेला शक्य होणार आहे. त्यानुसार आता अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेची देखील आता मंजुरी घेण्यात आली असून महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरु झाले आहे. त्यानुसार आता फीजीबीलीट अहवाल आता अंतिम टप्यात आला असून तो पुढील आठवड्यात ठाणे महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अहवालावरच ही अंतर्गत मेट्रो कितपत किफायतशीर आहे, याची माहिती होणार आहे. त्यानंतर लागलीच हा अहवाल महासभेच्या मान्यतेसाठी पटलावर ठेवला जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेचे म्हणने आहे.शहराच्या अंतर्गत प्रवासासाठी मेट्रो चालविण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, खर्च, कालावधी, त्यामूळे किती वेगाने किती प्रवाशांची वाहतूक शक्य होईल याचा अहवाल त्यानंतर सादर केला जाणार आहे. शहरातील एचसीएमटीआरच्या मार्गावरु न नक्की कोणत्या वाहनातून प्रवास करायचा याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामूळेच आरक्षण असलेल्या या जागेवर कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. अशावेळी महामेट्रो कंपनीच्या वतीने महापालिकेला किफायतशीर असा सर्व्हे मिळाल्यास भविष्यात ठाणेकरांना मेट्रोचा किफायतशीर प्रवासाची हमी मिळण्याची दाट शक्यता आहे. या सर्व्हेसाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागातील पादचारी पुल - सबवे या लेखाशिर्षाकामधून वर्ग करण्यात येणार आहे. या अहवालानुसार कोणत्या ठिकाणी किती बांधकामे बाधीत होणार आहेत, कोणत्या ठिकाणी आरक्षण बदलण्याची गरज आहे, आदींसह इतर माहिती मिळणार आहे. त्यानुसारच पुढील धोरण ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान अंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणे शक्य असल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMetroमेट्रो