शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 16:37 IST

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले

ठाणे : येत्या १० दिवसात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि रस्त्यावरील टोल बंद केले जातील, अशा शब्दांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ठाणे आणि रायगडमध्ये जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाददेखील उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड आणि पालघरचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवनात तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग, परिवहन विभाग, सिडकोच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. पुढील १० दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दोन्ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक शिव्या घालत आहेत. विरोधक आमच्या फोटोचे बॅनर लावत आहेत. आता हे सहन केलं जाणार नाही. आम्ही निधी आणून द्यायचं काम केलं आहे. त्यानंतर पुढील कामं तुम्ही करायला हवी होती. मात्र तुम्ही ती केली नाहीत. आता पुढील १० दिवसात रस्यांवरील खड्डे बुजवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिंदे आणि चव्हाण यांनी दिला. २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी कल्याण पत्री पुलाचं काम पूर्ण होणार असून याच दिवशी पत्री पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहितीदेखील संबंधीत अधिकाऱ्यांनीनी बैठकीत दिली. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा १२ मीटरचा उड्डाण पूल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा पूल आता २५ मीटरचा करण्यात येणार असून यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. लवकरच कोपर पुलाच्या कामालादेखील सुरुवात होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :tollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदेPotholeखड्डे