शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाच झाडांचा बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:50 AM

डोेंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील पाच मोठी वृक्षे अचानक सुकली आहेत. चैत्र पालवी फुटल्यानंतर पावसाळ््यात प्रत्येक झाड अधिक बहरते. मात्र, ही झाडे सुकल्याने त्यांचा कोणी जीव घेतला आहे, का असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यालगत अनेक झाडे आहेत. उन्हाळ््यात ...

डोेंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील पाच मोठी वृक्षे अचानक सुकली आहेत. चैत्र पालवी फुटल्यानंतर पावसाळ््यात प्रत्येक झाड अधिक बहरते. मात्र, ही झाडे सुकल्याने त्यांचा कोणी जीव घेतला आहे, का असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील रस्ता रहदारीचा आहे. या रस्त्यालगत अनेक झाडे आहेत. उन्हाळ््यात या झाडाची सावली वाटसरूंना दिलासा देते. त्याचबरोबर परिसरातील वातावरण थंड राहते. मात्र, महाविद्यालयाबाहेरील पाच झाडे भर पावसातही बहरलेली नाहीत. झाडे सुकल्याने त्यांना एकही पान नाही. त्यामुळे बुंध्यासह फांद्यांचा केवळ निष्पर्ण सापळा उरला आहे. पाऊस इतका पडूनही झाडांना एकही पाने का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.काही मंडळींनी ही झाडे रसायने टाकून मारली आहेत. त्यात झाडांचा बळी गेला आहे का?, अशी शंका डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उपस्थित केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र अधिकाºयांकडे केली आहे.या झाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यास झाडांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण समजू शकेल. या परिसरातील अन्य झाडे पावसाळ््यात हिरवीगार झाली आहेत. मात्र, पाच झाडेच सुकली आहेत.दरम्यान, या मागणीचा प्रत त्यांनी महापौर, उद्यान अधीक्षक, एमआयडीसी अभियंता, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना सादर केली आहे.