शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 19:37 IST

ठाण्यात बुधवारी अपघाताच्या चार तक्रारी दाखल झाल्या. या अपघातांमध्ये दोन विद्यार्थी, दोन रिक्षा चालक आणि एक महिला जखमी झाली.

ठळक मुद्देअपघाताच्या चार घटनादोन रिक्षा चालकही जखमीमहिलेस कारची धडक

ठाणे : ठाण्यात बुधवारी दाखल झालेल्या अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विद्यार्थ्यांसह पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.पातलीपाडा येथे एका कारने दोन पादचारी विद्यार्थ्यांना धडक दिली. हिरानंदानी येथे आझादनगरातील दोन विद्यार्थी रस्ता ओलांडत असताना २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा अपघात घडला. सुमीत हरिश यादव आणि प्रथमेश विलास शिंदे हे या अपघातात जखमी झाले. सुमीत यादवे याने बुधवारी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी कार चालक महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.दुसºया एका घटनेत मुंबई-नाशिक महामार्गावरील ह्युंडाई शोरूमसमोर रस्ता ओलांडणाºया एका महिला पादचार्‍यास भरधाव कारने धडक दिली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातामध्ये वागळे इस्टेटमधील हाजुरी दर्गा येथील रहिवासी खालिदा मोहम्मद हुसेन शेख (वय ५८) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला.घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड सिग्नलजवळ भरधाव कारच्या धडकेत एक रिक्षा चालक बुधवारी पहाटे जखमी झाला. आझादनगरातील मद्रासी चाळीत राहणारे किशोर सावंत हे ब्रम्हांड सिग्नलजवळ रिक्षा मागे वळवत असताना हा अपघात झाला. या अपघातात सावंत यांचा पाय मोडला असून, रिक्षाचेही नुकसान झाले. सावंत यांच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.कापूरबावडी येथील आशापुरा माता मंदिरासमोर एका भरधाव वाहनाने आॅटोरिक्षाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आत्माप्रसाद गुप्ता हे रिक्षाने मंदिरासमोरून जात असताना समोरच्या बसने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे गुप्ता यांनीही जोरात ब्रेक मारून रिक्षा थांबवली. त्यामुळे मागून येणार्‍या वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. गुप्ता यांच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात