शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील पेपरफुटीत पाचजण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:35 IST

दहावीच्या परीक्षेदरम्यान भिवंडीत विविध ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सहा पेपर फुटले होते.

भिवंडी : दहावीच्या परीक्षेदरम्यान भिवंडीत विविध ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सहा पेपर फुटले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. याशिवाय आपल्या पाल्यासाठी प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या एका वकील पालकासह दोन शिक्षक फरार आहेत.पेपर फुटल्याप्रकरणी नारपोली व शहर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांनी शहरातील दोन्ही ट्रेझरी केंद्रांबाहेर साध्या वेशातील पोलीस उभे केले. तेव्हा कामतघर येथील काकतिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्य केंद्रप्रमुख तथा उपमुख्याध्यापक अंबर मलिक अफरोज अन्सारी याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधीसमोर त्याने गैरप्रकार केल्याची कबुली दिली. अंबर मलिक हा अ‍ॅड. समीर फौजी यांच्या मुलीची खाजगी शिकवणी घेत असल्याने तिला परीक्षेदरम्यान मदत व्हावी, या उद्देशाने टेÑझरीमधून मिळालेले दहावीच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते अंबर मलिक याने अ‍ॅड. समीर फौजी यांना पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अंबर मलिक यास अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.>सहा विषयांचे पेपर आरोपींनी फोडलेकरिअर एज्युकेशन क्लासेसचा मालक शेख वजीर हफीझुर रेहमान याने त्याचा सहकारी शिक्षक नवीद अन्सारी यांच्या सहकार्याने शहरातील इस्लामपुरा येथील रफीउद्दीन फ की बॉइज हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्राचे प्रमुख साजीद खरबे यांच्याशी संपर्क साधला. साजीद खरबे यांच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवून त्या व्हॉट््सग्रुपवर पुरवल्या. ११ मार्च ते २० मार्चदरम्यान सहा पेपर फोडले आहेत. याप्रकरणी अ‍ॅड. समीर फौजी, शिक्षक साजीद खरबे व खाजगी कोचिंग क्लासचे मालक अजगर अली बारोड हे तीनजण फरार आहेत.