शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बर्निंग कारमध्ये पाच लाखांची रोकड खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 22:56 IST

सुदैवाने मोटारीचा चालक थोडक्यात बचावला

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावरील सरवली गावच्या हद्दीत एका धावत्या अर्टिगा मोटारीला अचानक आग लागण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. आगीत मोटारीमध्ये असलेली पाच लाखांची रोकड जळून खाक झाली मात्र सुदैवाने मोटारीचा चालक थोडक्यात बचावला. डॉ. सुंदरलाल प्रजापती असे मोटार जळालेल्या डॉक्टरचे नाव आहे.डॉ. सोनाळे येथे राहत असून ते त्यांच्याकडे असलेली पाच लाखांची रोकड अंजुरफाटा येथील बँकेत जमा करण्यासाठी त्यांच्या मोटारीमधून मुंबई नाशिक महामार्गाने निघाले होते. सरवली येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असताना मोटारीच्या इंजिनमधून अचानक धूर येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून ते मोटारीबाहेर पडले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मोटार आगीच्या भक्षस्थानी पडली. या आगीत प्रजापती यांनी बँकेत भरण्यासाठी सोबत घेतलेली पाच लाखांची रोकड जळून खाक झाली. आगीच्या झळीत डॉ. प्रजापती किरकोळ जखमी झाले.आगीची माहिती रांजनोली बायपास नाका येथील वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लगतच्या पाइपलाइनमधून पाणी उपलब्ध करून देऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीची नोंद कोनगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :carकारfireआग