शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पडघामध्ये गोदाम विकासाच्या वादातून केलेल्या गोळीबारात पाचजण अटक, चौदाजण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:54 IST

भिवंडी : तालुक्यात खारपट्ट्यातील जमीन मालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीन शिल्लक राहिली नाही.त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील ...

ठळक मुद्देराजकीय व आर्थिक वर्चस्वासाठी हल्लापाच आरोपींना अटक तर चौदा आरोपी फरारगोदामाच्या विकासकामांतून पेटला वाद

भिवंडी: तालुक्यात खारपट्ट्यातील जमीन मालकांनी विकासकांमार्फत गोदामांचा विकास केल्याने या भागात जमीन शिल्लक राहिली नाही.त्यामुळे विकासकांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील विविध गावात गोदामे बांधण्याचा सपाटा सुरू केला आहे. हा विकास सुरू असताना आपले राजकीय व आर्थिक वर्चस्व निर्माण करण्याकरीता काही पुढाऱ्यांमध्ये अहमीका लागली असुन त्यामधून मागील महिन्यात भाजपाच्या पदाधिका-यावर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराने परिसरांत खळबळ माजली होती. या घटनेने परिसरांत गँगवार सुरू होईल की काय? अशी भिती सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलीसांनी गोळीबाराच्या घटनेतून आरोपींचा छडा लावून चार जणांना अटक केली आहे.तर १४ जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.मागील महिन्यात २० आॅक्टोंबर रोजी पडघा लगतच्या आन्हे गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश उर्फ विजू गायकर यांच्यावर विरोधकांनी रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा हल्ला २००कोटीचा व्यवहार असलेल्या गोदाम विकासाच्या वादातून झाल्याचे तपासाअंती समोर आले. या घटनेच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी पुढे जाण्यास रस्ता न सापडल्याने आपली दुचाकी तेथेच सोडून पळाले होते. त्यामुळे पोलीसांना हत्येचा कट रचणा-यांचा सुगावा लागण्यास मदत झाली. या घटनेतील मुख्य सुत्रधार व त्याचे तिघे साथीदार सुपारीबाज गुंड असुन ते सातारा व पूणे भागातील कुप्रसिद्द गँगस्टर आहेत. सोमनाथ चव्हाण(सोमाभाई), गौतम काशिनाथ शिंदे व हर्षद सुरेश येमकर (पूणे) अशी तिघांची नांवे असुन त्यापैकी गौतम व हर्षद या दोघांना या पुर्वीच पोलीसांनी अटक केली आहे.तर सोमनाथ चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान हल्लेखोर व शार्प शूटर्स फरार झाले होते तर कट रचणारे विरोधक देवदर्शनासह पर्यटनासाठी पंजाब,जम्मू काश्मीर येथे निघून गेल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून गुरूवार रोजी हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन घोडविंदे, शूटर्स महेश उर्फ महाराज मधुकर चांदिलकर व विनायक सुरेश चव्हाण या तिघांना अटक केली. त्यांना शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर.ए. सावंत यांनी १३नोव्हेंबरपर्यंत तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येच्या कटातील १४ जण फरार असुन पडघ्यातील दोन राजकीय पुढाºयांचा देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पडघा पोलीसांना येथील गँगवारवर अंकूश ठेवण्यासाठी नव्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी