शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणार्‍या पाच भिक्षेकरींवर ठाण्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 16:17 IST

शहरातील सिग्नल आणि रेल्वे स्थानक, बाजारपेठ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भिक्षेकरी पादचारी तथा वाहनधारकांना त्रास देतात. भिक्षा मिळेपर्यंत त्यांची वाट अडवतात. भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत अशा भिक्षेकरींविरूद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देठाणे पोलिसांचा पुढाकारसार्वजनिक ठिकाणी पाहणीभिक्षेकरींची सुधारगृहात रवानगी

ठाणे : भिक्षेकरीमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत पाच भिक्षेकरींवर ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण पथकाने कारवाई केली. ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिकार्‍यानी दिली.ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी, चौकांमध्ये भिक मागणारी मंडळी हमखास दिसतात. लहान मुलांना समोर करून हे भिक्षेकरी वाहतुकीला अडथळाही निर्माण करतात. वाहनधारकांना हे भिक्षेकरी त्रस्त करून सोडतात. वाहनधारक खिसा सैल करेपर्यंत ते वाट अडवतात. प्रत्येक सिग्नलवर कार चालकांच्या खिडकीजवळ हे भिक्षेकरी कारला खेटून उभे राहतात. सिग्नल हिरवा झाल्यावरही भिक्षेकरी वाहनापासून दूर होत नाही. संपूर्ण शहरात हे चित्र पहावयास मिळते.सध्या राज्यभरात भिक्षेकरीमुक्त अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ठाण्यातील भिक्षेकरींवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी ठाण्याच्या बाल संरक्षण पथकाला दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण आणि त्यांच्या सहकार्‍यानी सोमवारी सकाळी कापूरबावडी येथील आशापुरा माता मंदिर आणि रेल्वे स्थानकाजवळ कारवाई केली. यावेळी भिक्षा मागताना सापडलेल्या तीन महिला आणि दोन पुरूषांना ताब्यात घेण्यात आले.अशा प्रकारच्या कारवाईमध्ये आरोपींना हजर करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे क्षेत्रासाठी कुर्ला येथे एकमेव न्यायालय आहे. या न्यायालयासमोर भिक्षेकरींना हजर केले असून, त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरींच्या सुधारगृहात करण्यात येत असल्याची माहिती अधिकार्‍यानी दिली. भिक्षा मागणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव भिक्षेकरूंना करून देत, यापुढे भिक्षा मागताना दिसल्यास पुन्हा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी भिक्षेकरींना यावेळी दिला.

टॅग्स :thaneठाणेBeggerभिकारीPoliceपोलिस