शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:28 IST

Corona vaccination : लवकरच आणखी खासगी केंद्रेही होणार सुरू. पहिल्या दिवशी १०० नागरिकांचं लसीकरण

ठळक मुद्देलवकरच आणखी खासगी केंद्रेही होणार सुरूपहिल्या दिवशी १०० नागरिकांचं लसीकरण

ठाणे  : मागील काही दिवसापासून कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्यावरुन आणि खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या मुद्यावरुन चर्चा सुरु होती. दरम्यान आता ठाण्यात पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. ठाण्यातील घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात हे पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु झाले असून येथे पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु यासाठी १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे ठाणे महापालिकेने अशा प्रकारे शहरातील १०२ खाजगी रुग्णालये आणि इतरांना लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. परंतु अनंत अडचणींचा सामना करुन ही लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर आता महापालिकेने खाजगी रुग्णालये, गृहसंकुले, उद्योग आदींच्या ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु करण्यासाठी धोरण आखले होते. याच धोरणाअंतर्गत आता र्पयत पालिकेने १०२ खाजगी रुग्णालये आणि इतर आस्थापनांना लसीकरणाची परवानगी दिली असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. त्यानुसार ठाण्यातील गृहसंकुलात पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून अर्पण फाऊंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी खाजगी रुग्णालयाची मदत घेण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या प्रमुख भावना डुंबरे यांनी दिली.१००० रूपये मोजावे लागणार

दरम्यान, या ठिकाणी पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी लस घेणाऱ्यांसाठी १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे या किमीतीवरुन भविष्यात वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खाजगी रुग्णालयांना लसींच्या किमंती ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु हे दर सर्व खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी एकच असावेत अशी मागणी आता ठाणेकर नागरिक करत आहेत. काही ठिकाणी कोव्हिशिल्डचे दर हे ७५०, तर कुठे ८५०, तर कुठे ९०० रुपये अशा स्वरुपात ते आकारले जात आहेत. परंतु आता हे दर समान करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे असले तरी आता खाजगीकरणाच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली असून येत्या काही दिवसात शहरातील इतर केंद्रावर देखील लसीकरण मोहीम सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रावर होणारी गर्दीदेखील कमी होण्यास मदत होईल. शिवाय लसीकरण मोहीमेचा वेग वाढून ही मोहीम वेळेत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणेhospitalहॉस्पिटलThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका