शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील दोन महिन्यात सुरु होणार क्लस्टरच्या पहिल्या टप्यातील सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:46 IST

ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरच्या विकासासाठी स्टेशन परिसर आणि वागळे पट्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंमित टप्यात असून दोन महिन्यात प्रत्यक्षात सर्व्हेला सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअखेर दोन महिन्यानंतर खऱ्या अर्थाने क्लस्टरच्या विकासाला होणार सुरवातसल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्यातस्टेशन परिसर आणि वागळे पट्यात होणार क्लस्टरचा पहिला प्रयोग

ठाणे - ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरिक्षत घरे विनामूल्य मिळणार आहेत. त्यानुसार आता या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरवात केली आहे. ठाणे स्टेशन आणि वागळे पट्टा या भागाचा आता पहिल्या टप्यात सामुहीक विकास केला जाणार आहे. त्यानुसार या कामासाठी आवश्यक असलेल्या सल्लागारांची नेमणूकीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून पुढील दोन महिन्यात प्रत्यक्षात या भागाच्या सर्व्हेला सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.उच्च न्यायालयाने नुकताच योजनेला हिरवा कंदिल दिल्यानंतर राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली होती. या योजनेसाठी किमान ८ हजार चौरस मीटर भूखंडाची आवश्यकता असून क्लस्टरमध्ये झोपडपट्टी आणि अधिकृत इमारती असल्यास त्यांची कमाल मर्यादा अनुक्रमे २५ टक्के आणि ४० टक्के असणार आहे. दरम्यान आधी ३०० चौरस फुटांची घरे ही भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता ही घरे मोफत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. क्लस्टर योजनेत ४ एफएसआयला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार पालिकेने याआधीच त्या दृष्टीने क्लस्टरचा अभ्यास सुरु केला आहे. या वाढीव एफएसआयनुसार झोपडपट्टी भागाला अधिक फायदा होणार असला तरी काही जुन्या योजना बंद कराव्या लागणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना देखील काहीशी रखडणार असल्याचे दिसत आहे. असे असले तरी आता पालिका पुन्हा या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अर्बन रिन्युव्हल प्लॅन तयार करणार असून ही योजना कोणत्या भागात कशा पध्दतीने राबविता येऊ शकते याचा अभ्यास करणार आहे. परंतु हा अभ्यास करीत असतांनाच उर्वरित ठिकाणी क्लस्टरची योजना राबविण्यास सुरवात केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.त्यानुसार पहिल्या टप्यात ठाणे स्टेशन परिसर आणि वागळे पट्टा यांची निवड करण्यात आल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार स्टेशन परिसरात काही बदल देखील करण्यास सुरवात झाली आहे. परंतु सध्या या दोन्ही भागातील असलेली गजबज पाहता आणि नव्या सोई सुविधा कशा पध्दतीने पुरविल्या जाऊ शकतात. याचा अभ्यास करणे पालिकेला थोड्याफार प्रमाणात कठीण होणार आहे. त्यामुळेच या भागाचा योग्य पध्दतीने विकास करण्यासाठी पालिका येथे सल्लागारांची नेमणूक करणार आहे. या सल्लागार नियुक्तीचे टेंडर देखील अंतिम झाले असून येत्या एक ते दिड महिन्यात या कामी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर या सल्लगाराच्या माध्यमातून या दोनही भागांचा अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. यामध्ये काही प्लॉट बदलावे लागणार आहेत, तसेच काही ठिकाणी एमआयडीसीची देखील जागा असल्याने त्या भागाचा विकास कशा पध्दतीने करता येऊ शकतो याची देखील चाचपणी केली जाणार आहे. शिवाय पालिकेच्या विविध विभागांकडून देखील सल्लागारांना मालमत्ताकर, पाणी पुरवठा आकार आदींसह इतर माहिती पुरविली जाणार आहे. त्यानंतर या भागाचे जीओ टॅगींग करुन बायोमेट्रीक सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात क्लस्टर योजना अंमलात येईल असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त