शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वर्षअखेरीस धावणार पहिली मेट्रो; वडाळा ते गायमुख १० स्थानके सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:34 IST

अतिरिक्त तपासणी मार्गिका उभारून मेट्रो सेवा सुरू होऊ शकते, हे स्पष्ट झाले. त्यानुसार, एमएमआरडीएने मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

अमर शैला मुंबई - वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो ४ अ) या दोन मेट्रो मार्गिकांच्या मिळून दहा स्थानकांवरून या वर्षअखेर मेट्रो धावणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो धावणार असल्याने ठाणे शहराला डिसेंबरअखेर पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंडाळे ते चेंबूर (मेट्रो २ बी) आणि दहीसर ते काशीगाव (मेट्रो ९) हा मार्गही डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे वर्षअखेरीस नव्या चार मेट्रोंचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येईल. 

मेट्रो ४ ही ३२.३२ किमी, तर मेट्रो ४ अ ही २.७ किमीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके आहेत. यातील पहिल्या टप्प्यात १०.५ किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाईल.  मेट्रो ४चे कारशेड उभारण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. मात्र, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी पदभार घेतल्यानंतर कारशेडविना मेट्रो सुरू केली जाऊ शकते का, याची चाचपणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यामध्ये अतिरिक्त तपासणी मार्गिका उभारून मेट्रो सेवा सुरू होऊ शकते, हे स्पष्ट झाले. त्यानुसार, एमएमआरडीएने मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, मेट्रो ९च्या दहीसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्यात ४.५ किमीवर चार स्थानके आहेत. हा मार्ग जुलैपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो २ बी मार्गावर मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यात ५.३ किमी मार्गावर पाच मेट्रो स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

टॅग्स :Metroमेट्रो