शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:04 IST

...मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला. 

ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २ जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशन काळात बेकायदा सुुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सीचे बुकिंग करून त्यावर कारवाईचे आदेश दिले. जेमतेम महिना उलटतो ना उलटतो तोच मंत्र्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी वरळी डोम येथे ७ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित केलेल्या प्रो गोविंदाचे प्रमुख प्रायोजकत्व रॅपिडोंनी स्वीकारल्याचे उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला. 

शिंदेगटाचे असलेले सहकार मंत्री संजय गायकवाड, संजय शिरसाट अलीकडेच अडचणीत सापडले असताना आता सरनाईकही वादात सापडले आहेत. राज्य सरकारने बाईक टॅक्सीचे धोरण स्वीकारले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीला अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. असे असतानाही रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपद्वारे सर्रास सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात मंत्री सरनाईक यांनी अन्य नाव वापरून रॅपिडो बाईकचे बुकिंग केले. जेव्हा बाईक चालक त्यांना घ्यायला आला तेव्हा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून कारवाईचे आदेश दिले. सरनाईक यांच्या या कृतीची तेव्हा चर्चा झाली. जेमतेम महिना पूर्ण होत नाही तोच वरळी डोम येथे मंत्र्यांचे पुत्र पूर्वेश यांनी प्रो गोविंदाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रॅपिडो असल्याचे स्पष्ट झाल्यावर वाद सुरू झाला असून, सरनाईकांवर टीका होत आहे.  

‘कारवाईची भीती दाखवून प्रायोजकत्व’अगोदर कारवाईची भीती घालून १० कोटी रुपयांत हे प्रायोजकत्व रॅपिडोला घेण्यास भाग पाडल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर हा खंडणी वसुलीचा प्रकार असल्याची टीका केली व शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांचे हे ‘प्रताप’ थांबवावे, असा दावाही त्यांनी केला. 

विरोधकांना प्रत्युत्तररोहित पवार हे विरोधी पक्षातील सदस्य आहेत, त्यांनी अनेक वर्षे स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबविलेले आहेत. आरोप केल्याशिवाय त्यांचे दुकान चालणार नाही, असे प्रत्युत्तर सरनाईक यांनी विरोधकांना दिले. 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस