शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी

By धीरज परब | Updated: November 13, 2023 23:18 IST

फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी लागल्या आगी

धीरज परब

मीरारोड - वाढलेले हवेतील प्रदूषण व ध्वनिप्रदूषण पाहता मीरा भाईंदर महापालिकेने फटाके फोडण्यासाठी रात्री ७ ते १० हि वेळ निश्चित केली असताना देखील त्याला काडीचे महत्व न देता रविवारी दिवाळी दिवशी बहुतांश लोकांनी सायंकाळ पासून मध्यरात्र उलटून गेल्या नंतर सुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले . यामुळे मोठे वायू प्रदूषण झालेच पण ध्वनी प्रदूषण होऊन लोकांना त्रास सहन करावा लागला  . तर फटाक्यां मुळे तब्बल ३२ ठिकाणी आगी लागल्या असून त्यात ४ घरांना व एका दुचाकीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे . 

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी आदेश काढून दिवाळी निमित्त रात्री ७ ते १० वाजे पर्यंतची वेळ मर्यादा फटाके फोडण्यासाठी दिली होती . त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून रात्री ८ ते १० ह्या दोन तासांची वेळ फटाके फोडण्यास दिली . 

तसे असताना मीरा शहरात मात्र रविवारी दिवाळी दिवशी सायंकाळ पासून मध्यरात्री उलटून गेल्या नंतर देखील कानठळ्या बसवणारे फटाके फोडले जात होते . शहरातील रुग्णालय , शाळा , धार्मिक स्थळं आदी शांतता क्षेत्रात सुद्धा फटाके फोडले गेले . पोलीस वा पालिकेचे कोणीही कारवाई करत नसल्याने मध्यरात्री नंतर सुद्धा फटाके फोडले गेले . 

मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने सर्वत्र घातक धुराचे साम्राज्य पासून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता . तर अनेकांना मोठ्या आवाजा मुळे त्रास होऊन रात्रीची झोप सुद्धा पूर्ण करता आली नाही . रुग्ण , लहान बाळ, गर्भवती स्त्रिया, वृद्ध आदींना जास्त त्रास सोसावा लागतो .  

तर फटाक्यां मुळे रविवारच्या रात्री तब्बल ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यात जय अंबे नगर , इंद्रलोक , कनकिया भागातील कांदळवन क्षेत्रात आगी लागल्या . कांदळवनातील ३ ठिकाणीच्या आगी अग्निशमन दलाने विझवल्या . 

फटाक्यां मुळे कचरा वा ज्वलनशील वस्तूं आगी लागल्या . ४ घरांना फटक्यां मुळे आगी लागल्या . सदर आगी ह्या रॉकेट फाटक्या मुळे लागल्या आहेत . त्यातील मीरारोडच्या सिल्वर सरिता भागातील पृथ्वी प्राईड ह्या २२ मजली टॉवरच्या १८ व्या मजल्यावरील सदनिका रॉकेट फटाक्याच्या आगीने मध्यरात्री जळून खाक झाली . मोठी आग लागल्याने इमारतीतील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आला . अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली . यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले . भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्या मुळे दुचाकी जाळून खाक झाली . 

शासन , कायदे नियम , न्यायालयीन आदेश चे उल्लंघन करून मीरा भाईंदर महापालिकेने शहरात नियमबाह्यरीत्या भर रस्त्या लगत प्रचंड प्रमाणात फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या आहेत . फटाक्यांनी घातक वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत असताना ते कमी करण्या ऐवजी महापालिकेने व पोलिसांनी सर्रास फटाके स्टॉल ना परवानग्या दिल्या . त्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करून फटाके फोडण्यासह वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणास तसेच आगी लागून झालेल्या नुकसानीला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfire crackerफटाकेthaneठाणे