शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

फटाकेविक्रेत्यांना ठाण्यात परवानगी नाही, न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : विक्रेते हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:14 IST

दिवाळीेसाठी स्टॉल लावणा-या फटाकेविक्रेत्यांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे.

ठाणे : दिवाळीेसाठी स्टॉल लावणा-या फटाकेविक्रेत्यांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला असून उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील फटाके विक्रेत्यांबरोबरच जुन्या फटाकेविक्रेत्यांनादेखील यंदा नाहरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे या विभागाने स्पष्ट केल्याने कोपरीत कित्येक वर्षांपासून होलसेल भावात फटाक्यांची विक्री करणाºया दुकानदारांवर कुºहाड कोसळली आहे.कोणत्याही स्वरूपाची जीवित अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भूखंड या ठिकाणी हे स्टॉल लावले जात आहेत. त्यानुसार मागील वर्षी तब्बल २५० च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते. त्याच्या भाड्यातही पालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. परंतु, मंगळवारी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाकेविक्रीला बंदी घातल्याने आता तात्पुरत्या स्वरूपात फटाकेविक्री करणाºया फटाकेविक्रेत्यांवरही गंडांतर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बुधवारी याबाबत महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केल्याचे समजते. एकाही अर्जाला ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागाने दिलेले नाही.मोठे फटाके डेसिबलच्या मर्यादेत- फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या ध्वनिपातळी तपासणीत ठाण्याच्या मार्केटमधील १९ मोठ्या फटाक्यांपैकी सर्व फटाके ध्वनिमर्यादेत असल्याचे आढळले. त्यामुळे ठाणे मार्केटमधील मोठ्या आवाजाचे सर्वच फटाके या तपासणीत पास झाले.ध्वनिपातळी तपासणीचे हे चौथे वर्ष आहे. ठाणे विभागातील फटाक्यांची तपासणी बुधवारी सकाळी रायलादेवी लेक प्रिमायसेस येथे करण्यात आली. यावेळी ठाणे मार्केटमधून विविध कंपन्यांचे सुमारे १९ फटाक्यांचे प्रकार तपासणीसाठी आणले होते. यावेळी पिकॉक स्मॉल, पिकॉक बिग, सद्दाम ग्रीनआॅटोबॉम्ब, चारमिनार, डबल ब्रॅण्ड, लिंगा १०००, फेस्टिव्हल माळ १०००, ताजमहाल १०००, रेड ग्रॅण्ड क्रॅकर्स २०००, स्टॅण्डर्ड इलेक्टिव्ह क्रॅकर्स १०००, ताजमहाल फायर क्रॅकर्स ५००० ची माळ, रेड ग्रॅण्ड कॅकर्स १०००, जम्बो फायर क्रॅकर्स, टष्ट्वेल्व्ह (१२) शॉट्स, श्री माहेश्वरी २००० यांची ध्वनिपातळी मर्यादेपेक्षा कमी आढळली.रसायनांचा उल्लेख नाहीउत्पादक कंपनीने फटाक्यांच्या पॅकिंग कव्हरवर फटाक्यांत वापरलेले रसायन लिहिणे तसेच फटाक्याची ध्वनिपातळी डेसिबलमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. मात्र, या तपासणीवेळी आणलेल्या अनेक फटाक्यांच्या कव्हरवर रसायन तसेच ध्वनिपातळीचा उल्लेख नव्हता. त्याचीही नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून त्यात्या उत्पादक कंपन्यांना ती बाब कळवण्यात येणार आहे.फटाक्यांचा हा तपासणी अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरही अपडेट करण्यात आला आहे. तो तेथे सर्वांना पाहता येऊ शकेल.ठाणे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले जवळपास सर्व फटाके हे ध्वनिपातळीबाबत वापरण्यास योग्य आहेत. कायद्यानुसार एकहजार, दोन हजार, पाच हजारांच्या माळांना १३० ते १३९ डेसिबल इतकी मर्यादा आहे. तर बॉम्ब, पिकॉक, चारमिनार या सिंगल फटाक्यांना १२५ डेसिबल इतकी मर्यादा आहे. तपासणीतील सर्व फटाके हे डेसिबलच्या मर्यादेत आहेत, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणेचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी दिली. यावेळी वरिष्ठ अधिकाºयांसह विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीdiwaliदिवाळी