शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलातील फायर फायटींगच्या वाहनांची दुरुस्ती लटकली, महासभेत उघड झाली बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 15:11 IST

अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक स्वरुपातील दोन फायर फायटींग वाहने बंद अवस्थेत असल्याची बाब महासभेत उघड झाली आहे. परंतु ही वाहने लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

ठळक मुद्देएक वाहन सहा महिन्यापासून बंदनिगा देखभालीचा प्रस्तावच केला नव्हता

ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील उंच इमारतीला आग लागल्यास ती विझविण्यासाठी अत्याधुनिक स्वरुपाची असलेली दोन वाहने तब्बल सहा महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याची माहिती बुधवारी झालेल्या महासभेत समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या नवीन वाहने घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी कशी द्यायची असा सवाल सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला.                    ठाणे शहरात आजच्या घडीला मोठ मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या वेळेस आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन विभागाकडून अत्याधुनिक फायर फायटींगची वाहने खरेदी करण्यात आली आहेत. परंतु ही वाहने नादुरुस्त असल्याची माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली. त्यामुळे एखाद्या वेळेस आगीची घटना घडली तर ती आग कशी विझविली जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही वाहने केव्हापासून बंद अवस्थेत ती दुरुस्त का केली जात नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणले होते. त्यानुसार वाहन विभागाचे अधिकाऱ्यांनी यातील एक वाहन सहा महिन्यापासून बंद असल्याची कबुली दिली. तर दुसरे वाहन हे दिड महिन्यापासून बंद असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहातील वातावरण आणखीच तापले. असे असतांना आम्ही नवीन वाहन खरेदीला मंजुरी का द्यायची असा सवालही म्हस्के यांनी उपस्थित केला. ७ डिसेंबरला सुध्दा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यातील एक वाहन वापरले गेले होते. परंतु त्याची शिडी अर्ध्यावरच अडकली होती. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.               वास्तविक पाहता ही वाहने खरेदी केल्यानंतर त्याची निगा देखभालीबाबत कोणत्याही तरतूद न करण्यात आल्यानेच या वाहनांची दुरुस्ती रखडली असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्यावरुन सुध्दा प्रशासनावर सदस्यांनी आगपाखड केली. परंतु नवीन वाहन खरेदी करतांनाच त्या वाहनांची निगा देखभालीचाही समावेश करण्यात आल्याचे प्रशासाने सांगितले. तसेच दुरुस्तीसाठी उभी असलेले एक वाहनसुध्दा लवकरात लवकर दुरुस्त केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अखेर हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाfireआग