शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग: लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 21:54 IST

ठाण्यातील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी टळलीठाणे महापालिकेच्या पाच अग्निशमन दल केंद्राने केले शर्थीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कागदपत्रे, फर्निचर आणि विक्रीचे कपडे जळून खाक झाले. ठाणे अग्निशमन दलातील पाचही केंद्रातील जवानांनी दोन तासांमध्ये शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोखरण रोड क्रमांक एक येथील रेमंड कंपनीच्या कंम्पाऊडमधील मुख्य फॅक्टरी लगत असलेल्या कॅन्टीन समोरील कार्यालयात बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाचपाखाडी, जवाहरबाग, बाळकूम, वागळे इस्टेट आणि कोपरी येथील अग्निमन दल केंद्रातील जवानांनी स्थानक अधिकारी आर. पी. राऊत आणि उपस्थानक अधिकारी एस. एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सहा वॉटर टँकर, तीन रेस्क्यू वाहन, पाण्याचे तीन मोठे टँकर आदींच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सायंकाळी ६ पर्यंत ही आग धुमसत होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण आले तरी याठिकाणी उशिरापर्यंत ‘कुलिंग’चे काम सुरु होते. सकाळी कामगारांना कंपनीच्या प्रवेशद्वारातून आत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आधीच या कंपनीत लॉकडाऊनमुळे अवघ्या १० ते २० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामासाठी प्रवेश दिला जातो. त्यात आगीची ही घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आगीत कंपनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.* शाळा बंद असल्यामुळे धोका टळलारोड क्रमांक एक हा वर्तकनगर, शिवाईनगरकडे जाणारा मोठा रहदारीचा रस्ता आहे. याच रस्त्याच्या आतील बाजूस काही अंतरावरच रेमंडचे आऊटलेट आणि कार्यालय देखिल आहे. काही अंतरावरच सुलोचना देवी सिंघानिया शाळा आहे. शाळा बंद असल्याने तसेच पहाटेची वेळ असल्यामुळे मोठी जिवित हानी टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेfireआगRaymondरेमंड