शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:04 IST

गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री मित्र जहांगीर मोरे याच्यासोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. कारमधील दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. 

उल्हासनगर : ओमी कलानी टीमचा पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक संदीप गायकवाड मित्रासह बुधवारी रात्री ११ वाजता श्रीराम चौकातून जात होते. त्याच वेळी कारमध्ये दबा धरून बसलेल्या दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गोळीबार केला. मात्र, पोलिसांची गस्त घालणारी गाडी आल्याने संदीपचा जीव वाचला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गायकवाड हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. बुधवारी रात्री मित्र जहांगीर मोरे याच्यासोबत श्रीराम चौकातून घरी जात होते. कारमधील दोघांनी संदीप यांच्यावर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. तसेच गोळीबार केला. 

हल्ल्याच्या दरम्यान पोलिसांची गस्त घालणारी गाडी आल्याने, संदीप याने पोलिसांच्या गाडीचा आश्रय घेतला. त्यामुळे हल्लेखोरांनी कारसह पळ काढला. पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोरांनी कार उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात टाकून धूम ठोकली. पोलिसांनी हल्लेखोरांची गाडी ताब्यात घेतली असून तपासासाठी तीन पथके तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.ओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष असलेले गायकवाड हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, अशी माहिती भामे यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरFiringगोळीबार