शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Fire News : वसतिगृहास आग; ७४ विद्यार्थ्यांची सुटका, भिवंडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 06:15 IST

भिवंडी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुलामुलींच्या वसतिगृहास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

भिवंडी :  भिवंडी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाच भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुलामुलींच्या वसतिगृहास भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या आगीमुळे येथील ७४ विद्यार्थी अडकून पडले होते. सुदैवाने या सर्व विद्यार्थ्यांना अग्निशमन दल व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटने ती लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत अरहम लॉजिस्टिक कॉम्प्लेक्स या ठिकाणी एका इमारतीमध्ये ईडीयु लाईट या संस्थेचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्र असून या ठिकाणी सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. पाहता पाहता ती दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहापर्यंत पोहोचली. इमारतीत धूर पसरल्याने विद्यार्थ्यांनी टेरेसचा आसरा घेतला. त्यानंतर आलेल्या भिवंडी महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास स्थानिकांच्या मदतीने प्रयत्न केला. या वसतिगृहात सध्या ७४ प्रशिक्षणार्थी असून त्यापैकी ३० मुली आहेत. हे सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून त्यांना या ठिकाणी कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह व डाटा एन्ट्रीचे तीन महिन्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व प्रशिक्षणार्थींची सुखरूप सुटका स्थानिकांच्या मदतीने केली. परंतु, या आगीत सर्व प्रशिक्षणार्थींचे कपडे व अत्यावश्यक साहित्य पूर्ण जाळून खाक झाले आहे. स्थानिकांनी सुटका केलेल्या सर्वांना नजीकच्या अरहम लॉजिस्टिक कार्यालयात बसविल्यानंतर रात्री त्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी केली. यासाठी पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनीदेखील धाव मदतकार्य राबविले. या आगीमुळे येथील ७४ विद्यार्थी अडकून पडले होते. सुदैवाने या सर्व विद्यार्थ्यांना अग्निशमन दल व स्थानिकांनी अथक प्रयत्नाने बाहेर काढले. शॉर्टसर्किटने ती लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडी