शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे; बादलीनं पाणी घेऊन आग विझवण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:12 IST

अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या कामात अडथळा

कल्याण- रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागच्या बाजूला कचऱ्याला आग लागली. या ठिकाणी असलेला रस्ता अतिशय अरुंद असल्यानं तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आरपीएफ व रेल्वे कर्मचाऱ्यांनी झाड्यांच्या फांद्यांच्या मदतीनं आणि बादली बादलीनं पाणी आणून आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे रेल्वे जंक्शन असूनही कल्याण रेल्वे स्थानकातील आग विझवण्याची यंत्रणा कुचकामी असल्याची बाब आज पुन्हा एकदा उघडकीस आली.कल्याण रेल्वे स्थानकाचा परिसर 65 एकर इतका मोठा आहे. कल्याण हे जंक्शन स्थानक असल्यानं या ठिकाणाहून लाखो प्रवासी प्रवास करतात. या ठिकाणाहून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या आणि उपनगरीय गाड्यांची संख्या मोठी आहे. स्थानकात एकूण आठ प्लॅटफॉर्म आहेत. फलाट क्रमांक एक जवळ रेल्वेचं तिकीट आरक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या मागे रेल्वे परिसरातील कचरा टाकला जातो. या कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात येणार होतं. मात्र त्याठिकाणी पोहोचण्याचा रस्ता अरुंद असल्यानं आणि परिसरात केबल वायर असल्यानं अडथळा निर्माण होतो.अग्नीशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वीच आरपीएफ जवान व कामगारांनी कचऱ्याला लागलेली आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकले. तसेच झाड्यांच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे फलाट क्रमांक एकसह अन्य परिसरात धूरच धूर झाला होता. हा धूर प्रवाशांच्या नाकातोंडात गेल्यानं प्रवाशांचा श्वास कोंडला. आगीमुळे मुंबईहून कल्याणला येणारी गाडी पत्री पुलाजवळ एक तास उभी करुन ठेवली होती. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राच्या मागे टाकण्यात येणारा कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कामगार अथवा कचरा गाडी येत नाही. त्यामुळे त्याठिकाणी कचरा साचला आहे. काही महिन्यापूर्वी दुरुंतो एक्सप्रेसच्या डब्याला कल्याण स्थानकात आग लागली होती. वर्षभरापूर्वी राजेंद्रनगर एक्सप्रेसच्या इंजिनालाही आग लागली होती. त्यावेळीही स्थानकात आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानाला कसरत करावी लागली होती. 

टॅग्स :fireआग