शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे उपवनच्या जंगलातील आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 18:38 IST

उपवन तलावाच्या चौबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगालातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगालस लागलेली आग ही परिसरात फिरणा-या व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळी गावंड इमारतीमधील रहिवाश्याच्या नजरेत आले. त्याने त्वरीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वनव्याची माहिती दिली

ठळक मुद्देलागून संजय गांधी राष्टÑीय उद्यानरात्रभर जंगल जळून होणार अनर्थ वनविभागाच्या सतर्कतेने टळला.वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळी गावंड इमारतीमधील रहिवाश्याच्या नजरेत

ठाणे : उपवन तलावाजवळील जंगलास सायंकाळीअचानक आग लागली. या वणव्यात परिसरातील गवत मोठ्याप्रमाणात जळले. वन अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन या आगीला आटोक्यात आणल्यामुळे रात्रभर जंगल जळून होणार अनर्थ वनविभागाच्या सतर्कतेने टळला.        उपवन तलावाच्या चौबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगालातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगालस लागलेली आग ही परिसरात फिरणा-या व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळी गावंड इमारतीमधील रहिवाश्याच्या नजरेत आले. त्याने त्वरीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वनव्याची माहिती दिली. त्यास अनुसरून अग्निशमनदलाची गाडी या उपवन तलावाजवळ गेली. पण आग आतमध्ये जंगलात असल्यामुळे घटनास्थळी गाडी जाणे शक्य झाले नाही.        या अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊरच्या वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात ही घटना आणून देण्यात आली. यानुसार वन अधिकारी, कर्मचाºयांनी या वनव्याच्या ठिकाणी जावून झाडांच्या फांद्याव्दारे लागलेली आग विझवण्यात यश मिळवल्याचे येऊर वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. वनअधिकारी व कर्मचाºयांची नजर चुकवून या जंगलात शिरणाºयांकडून ही आग लागल्याचा आंदाज आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या या येऊरच्या जंगलातील माननिर्मित हालचालींवर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या जंगलातील वनवा राष्टÑीय उद्यानात शिरून पशूपक्षी, वन्यप्राणी आणि वनसंपत्ती, औषधी वनस्पती जळून नष्ठ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.............

टॅग्स :thaneठाणेforestजंगल