शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:32 IST

भाजीपाल्याची आवक घटली; डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या

- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात नाशिक आणि गुजरात राज्यातून भाजीपाला पुरवठा होत असतो, परंतु अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच डाळींच्या दरांमध्येही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.पालघर जिल्ह्यात नाशिकसह गुजरात राज्यातल्या वापी आणि सुरत भागातून सुमारे ५० ते ६० ट्रक भाजीपाला वितरित केला जातो. तर जिल्ह्यातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रफळावर वेलवर्गीय भाजीपाला ज्यात दुधी, गलके, कारले आदी भाजीसह मिरची, सिमला मिरची, वांगी, टॉमेटो आदीचे उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळीमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. कांद्याचाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलो असा भाव झाला असून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बंद झाले असून नोकऱ्यांवर पाणी फिरले आहे. अनेक उद्योगधंदेही बंद पडल्याने हातमजुरी करणाºया गोरगरीबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे.सध्या लोकल सेवा बंद असल्याने माझ्या पतीला कामावर जात येत नसल्यामुळे एप्रिलपासून अर्धाच पगार मिळत आहे. त्यामुळे आमच्या घरचे बजेट गडबडले असून येत्या सणासुदीच्या दिवसात आणखी भाव वाढण्याची शक्यता वाटते.- शालिनी मेहेर, ग्राहकपालघर जिल्ह्यात भाजीपाल्याची नाशिक आणि गुजरातमधून होणारी आवक सध्या घटली असल्याने दर वाढले आहेत. मात्र नोकºया तसेच कामधंदे बंद झाल्याने ग्राहकांकडून कमी भाजीपाला खरेदी केला जात आहे.-देव लुक्षा, भाजीविक्रेता पालघरअनेक कष्ट घेऊन शेतकरी शेतमाल पिकवतो, मात्र विक्री व्यवस्थेतील असंख्य अडचणींमुळे तो त्याची विक्री करू शकत नाही. त्यामुळे भाववाढीनंतरही उत्पादकांना कोणताच आर्थिक फायदा होत नाही.- शेतीनिष्ठ देवेंद्र राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरीभाजीपाला-डाळी महागण्याची कारणेपालघरला भाजीपुरवठा करणाºया नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरांनी उचल खाल्ली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात डाळीही १५ ते २० रुपयांनी महागल्या आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या