शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:59 IST

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच घरची परिस्थिती प्रतिकूल असणाऱ्या मात्र शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक भार उचलून संकेत विद्यालय एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे.

- स्नेहा पावसकर ठाणे : विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच घरची परिस्थिती प्रतिकूल असणाऱ्या मात्र शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या आर्थिक भार उचलून संकेत विद्यालय एक वेगळाच आदर्श निर्माण करत आहे. एकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना दुसरीकडे संकेत विद्यालय मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.मानपाडा येथील संकेत विद्यालय या शाळेची स्थापना १९९२ साली झाली. शाळेत लहान शिशूपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग चालतात. प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या असून आजघडीला शाळेत २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी शिकवले जाते. दोन्ही तुकड्यांमध्ये सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते.मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने इयत्ता दुसरीपासून ‘वाचनकोपरा’ हा उपक्रम राबवला जातो. यात मुलांना ग्रंथालयात जाऊन त्यांच्या आवडीची पुस्तके वाचता येतात. स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधसारख्या परीक्षांना बसण्याची संधी देऊन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. अभ्यासात कमजोर असणाºया मुलांसाठी शाळेतच मोफत शिकवणी घेतली जाते. त्या मुलांचा घरी अभ्यास कसा घ्यावा, याचे त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन आर्थिक मदत करते. त्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी शाळा उचलते.>आपल्याला मराठी भाषेचा व आपल्या शाळेचा अभिमान असला पाहिजे. केवळ शेजाºयांची मुले इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत घालू नये. सुरुवातीला काही पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात आणि नंतर मात्र तेथील खर्च न झेपल्याने पुन्हा मराठी शाळांकडे वळतात. अशा पालकांचा राग येतो, तर मुलांची अवस्था पाहून वाईट वाटते. आमच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ झाले आहेत. प्रवेशासाठी शाळेत नेहमीच स्पर्धा असते.-आर.के.चौधरी, मुख्याध्यापक,प्राथमिक विभाग, संकेत विद्यालयमाझ्या तिन्ही मुली संकेत विद्यालयात शिक्षण घेत आहेत. हुशार विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवण्याच्या दृष्टीने तर कमजोर मुलांना हुशार बनवण्याच्या दृष्टीने शाळा विविध उपक्रम राबवते. शाळेची शिस्त उत्तम आहे. शाळा व्यवस्थापनाबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करतात. इंग्रजी माध्यमापेक्षा आमची मुले मराठी माध्यमात शिकतात, याचा आम्हाला आनंद आहे. -शुभांगी कदम, पालक