शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:27 IST

गाळेधारक, भाडेकरुंना नोटीस, भोगवटा प्रमाण पत्राचे वाटप; तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात

ठळक मुद्देदुपारी अडीच नंतर इमारत मोकळी करुन घेतल्यानंतर तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

डोंबिवली - पश्चिमेकडील महात्मा फुले पथावरील ४० वर्षे जून्या अतिधोकादायक दोन मजली गोडसे इमारतीवर अखेर गुरुवारपासून महापालिकेने हातोडा फिरवला. बुधवारच्या एका दुस-या मजल्यावरील घरामध्ये स्लॅब कोसळून ५२ वर्षीय विकास फडके या रहिवाश्याचा त्या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेत माणसाचा जीव महत्वाचा असून तातडीने इमारत खाली करुन सगळयांचे हक्क राहण्यासाठी महापालिकेने भोगवटा प्रमाण पत्र देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना दिले होते.त्यानूसार जोशींच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत गाळेधारक, भाडेकरु यांना भोगवटा प्रमाण पत्र देत जागा तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार दुपारी अडीच नंतर इमारत मोकळी करुन घेतल्यानंतर तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रभागक्षेत्र अधिका-यांच्या देखरेखीखाली ही कारवाई सुरु झाली असून पश्चिमेकडील महात्मा फुले रस्ता, गांधी रस्ता हे दोन्ही प्रचंड वर्दळीचे रस्ते त्या इमारतीलगत येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पोकलेन, जेसीबी आणुन लगेच पाडकाम कारवाई करण्यासाठी काही अडथळे येत आहेत. रेल्वे स्थानकानजीक हमरस्ते व सदरहू इमारत असल्याने तेथून लाखो नागरिक, वाहनांची ये जा दिवस रात्र सुरु असते. त्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणाचेही नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये या उद्देशाने महापालिकेच्या कर्मचा-यांकडूनच कारवाईला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. पुढील काही दिवस ही पाडकाम कारवाई सुरु राहणार आहे. इमारत मालकाने वेळोवेळी रहवाश्यांना महापालिकेने दिलेल्या अतिधोकादायक इमारतीसंदर्भातीन नोटीसची माहिती दिल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली.दरम्यान बुधवारच्या दुर्घटनेत मयत झालेले रहिवासी फडके यांच्यावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटूंबियांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे धात्रक यांनी सांगितले. तसेच मयत फडके यांच्या वयोवृद्ध आईला त्यांचा दुसरा मुलगा घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. जुनी डोंबिवली परिसरात ते रहात असल्याचे धात्रक म्हणाले.

 

गाळेधारक आधी इमारतीमधून निघायला तयार नव्हते, परंतू इमारत जीर्ण झाली असून कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १८ जणांना नोटीस देत तातडीने जागा रिकामी करण्यास सांगितले, तसेच कागदपत्रांची पूर्तता करुन भोगवटा प्रमाणपत्र दिले. त्यानंतर सगळयांनी सामान काढुन जागा रिकामी केल्यावर दुसरा मजला निष्कसीत करण्याचे काम सुरु झाले आहे. - ज्ञानेश्वर कंखरे, ह प्रभागक्षेत्र अधिकारी 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMuncipal Corporationनगर पालिका