शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जयजित सिंह यांनी सूत्रे स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 01:36 IST

राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक फणसळकर यांची ठाण्यातून बढतीवर बदली झाल्यानंतर मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडून घेतली.

ठळक मुद्दे विवेक फणसळकर यांच्या बढतीनंतर २० दिवसांनी नियुक्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक फणसळकर यांची ठाण्यातून बढतीवर बदली झाल्यानंतर मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडून घेतली. फणसळकर यांच्या बदलीनंतर तब्बल २० दिवसांनी राज्याच्या गृहविभागाने या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती केली.ठाण्याचे २४ वे पोलीस आयुक्त म्हणून सिंह यांनी अखेर आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबई पाठोपाठ राज्यात बहुचर्चित असलेल्या ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी कोणाची वर्णी लागणार यावरुन अनेक खलबते सुरु होती. अखेर गृह विभागाने सोमवारी रात्री राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सिंह यांची या पदावर नियुक्ती केल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पदभार घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात सिंह यांना मुख्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्वागताची सलामी (गार्ड आॅफ आॅनर) दिल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. मेकला यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मितभाषी तसेच कर्तव्यकठोर असलेले सिंह हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.* मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया इमारतीजवळ जिलेटीनच्या कांडया असलेली मोटारकार मिळाली होती. याच मोटारीचे ठाण्यातील मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही तत्कालीन एटीएस प्रमुख सिंह यांच्या अधिपत्याखालील पथकांनी यशस्वी केला होता. हिरेन कुटूंबीयांनी मुंबईचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर खूनाचा आरोप केल्यानंतर याप्रकरणी एटीएसने तात्काळ गुन्हा दाखल केला होता. ५ मार्च २०२१ रोजी आकस्मिक मृत्युचा मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्हा ६ मार्चला एटीएसला वर्ग झाला. त्याच दिवशी हा खूनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर क्रिकेट बुकी नरेश गौर आणि निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना याप्रकरणी अटक केली होती. वाझेचाही ताबा एटीएसने न्यायालयात मागितला होता. मात्र तो घेण्यापूर्वी हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडे वर्ग झाले होते.अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती झाल्यानंतर रेल्वे, लाचलुचपतप्रतिबंधक विभाग आणि एटीएस प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याआधी मुंबईत परिमंडळ दहाच्या उपायुक्तपदीही ते होते. कामातील गतिमानता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन घेण्यातही त्यांचा आपल्या अधिकाऱ्यांना आग्रह असतो.* सूत्रे घेताच अधिकाऱ्यांची बैठक-ठाण्यात पोलीस आयुक्त पदाची सूत्रे घेताच सह आयुक्त डॉ. मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, संजय येनपुरे, उपायुक्त बाळासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे आदी सर्व वरिष्ठ अधिकाºयांची त्यांनी तातडीने बैठक घेतली. बुधवारी असलेल्या बुद्धपोर्णिमा बंदोबस्ताचा आढावा घेतानांच ठाण्यातील कायदा सुव्यवस्था तसेच कोरोना संदर्भात सुरु असलेल्या निर्बंधाबाबत आपल्या अधिकाºयांकडून त्यांनी माहिती घेतली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस