शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एटीएम चोरीतील आणखी एकाला ५५ हजारांच्या रोकडसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:27 IST

एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची तोडफोड करुन १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या टोळीपैकी उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या भीमा बहाद्दूर जोरा यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. आतापर्यंत या चोरीतील आठ लाख ४३ हजार ९०० इतकी रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउत्तरप्रदेशातून केली अटक आतापर्यंत आठ लाख ४३ हजारांची रोकड हस्तगत एटीएम संचासह चोरली होती १७ लाख ९६ हजारांची रोकड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहिसर गावातील एक्सीस बँकेच्या अ‍ॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची तोडफोड करुन १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडची चोरी करणा-या आठ जणांच्या टोळीपैकी उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या भीमा बहाद्दूर जोरा यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्याकडून ५५ हजारांची रोकड आणि दोन मोबाईल हस्तगत केले असून आतापर्यंत या चोरीतील आठ लाख ४३ हजार ९०० इतकी रोकड हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.जोरा हा नेपाळमध्ये पळून जाण्याच्या बेतात असतांनाच उत्तरप्रदेशातील कानपूर येथून उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. १२ जून रोजी त्याला ताब्यात युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, पोलीस नाईक विक्रांत कांबळे आणि दादा पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि एटीएम चोरीतील ५५ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्याला १४ जून रोजी एटीएम चोरीच्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली. याच प्रकरणात त्याला १५ जून रोजी ठाणे न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे तालुक्यातील दहिसर ग्रामपंचायतीजवळील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रातील एटीएम संचाची मोडतोड करुन त्यातील १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह ८ जून रोजी चोरण्यात आले होते. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या दोन वेगवेगळया पथकांनी उल्हासनगर, अंबरनाथ आणि थेट उत्तरप्रदेशात जाऊन आतापर्यंत सहा जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांनी उल्हासनगरातून अटक रफिकरौफ सय्यद याला अटक केली. आतापर्यंत सुरेश म्हात्रे याच्यासह चौघा जणांकडून सहा लाख ७१ हजार ९००, रफिकरौफ याच्याकडून एक लाख १७ हजार रुपये तर जोराकडून ५५ हजार अशी आठ लाख ४३ हजार ९०० ची रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी