शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

खड्डे बुजवा; अन्यथा विसर्जन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:57 IST

अरविंद मोरे यांचा इशारा : आग्रा रोडवरून शिवसेनेला दिला घरचा आहेर

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. कल्याण-आग्रा रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. महामंडळाने गणेशोत्सवाआधी बुजवले नाहीत, तर गणेश विसर्जन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक अरविंद मोरे यांनी दिला आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना मोरे यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

काही दिवसांपूर्वी मोरे यांनी चिखलफेक आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. मोरे हे शिवसमर्थ सेवा या गणेशोत्सव मंडळाचे सर्वेसर्वा आहेत. यंदा त्यांनी १० फुटी गणेशमूर्तीची स्थापना करण्याचे जाहीर केले आहे. भाजपने काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. त्यावर आधारित त्यांनी देखावा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाणार आहे. आग्रा रोडवर खाडीच्या विसर्जनस्थळाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गात खड्डे असल्यास गणेशमूर्तीचे विसर्जन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्जगणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज आहे. दीड दिवसाच्या गणपतीसाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना महापालिकेने मांडली आहे. प्रत्येक प्रभागात महापालिकेचा एक ट्रक असेल. त्यात असलेल्या टाकीतील स्वच्छ पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल. तसेच पर्यावरणाचे संतुलनही बिघडणार नाही, असे आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या महत्त्वाच्या ४२ ठिकाणी सुरक्षिततेसाठी २२३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. २९०० हॅलोजन, ६२ लायटिंग टॉवर बसवले आहेत. वीजपुरवठा निरंतर सुरू ठेवण्यासाठी ६७ जनरेटरची सोय केली आहे. कल्याण शहरात ३० विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी विठ्ठलवाडी, जरीमरी १०० फुटी रोड, मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र येथे कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. डोंबिवलीत ४० विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेला पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्यानगरी रोड, शिवम हॉस्पिटल, टिळकमंदिर शाळा, आयरे रोड, कस्तुरी प्लाझा, प्रगती कॉलेज, मिलापनगर, आजदेगाव, रिजन्सी इस्टेट तर पश्चिमेला आनंदनगर गार्डन, भागशाळा मैदान येथे कृत्रिम तलाव तयार केले आहेत. दरम्यान गणेशोत्सवापूर्र्वी खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.खड्डे दाखवल्यास राजीनामा देण्याचे आव्हानशिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांनी त्यांच्या प्रभागातील एकाही रस्त्यावर खड्डा पडलेला नाही. प्रभागातील रस्त्यावर खड्डा दाखवा. खड्डा पडलेला असेल, तर नगरसेवकपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा प्रभाग हा खड्डेमुक्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे.बाप्पांच्या आगमनापूर्वी डागडुजी कराचिकणघर : बाप्पांच्या आगमनाला काही दिवस बाकी असतानाही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे ते तातडीने बुजवावेत, अशी मागणी येथील शिवसेना शाखाप्रमुख संतोष भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. येथील जीवनसंध्या सोसायटी ते छत्री बंगला आणि छत्री बंगला ते रामबाग डॉन बास्को शाळेपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आगमनाच्या मिरवणुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.