शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:24 IST

मीरा- भार्इंदरच्या नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहीत म्हणून डासांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाऱ्या १८० कर्मचा-यांना घरी बसवणारे नगरसेवक मात्र नागरिकांच्या पैशावर मजा करण्यासाठी कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थळी जाणार आहेत.

मीरा रोड - मीरा- भार्इंदरच्या नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहीत म्हणून डासांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाऱ्या १८० कर्मचा-यांना घरी बसवणारे नगरसेवक मात्र नागरिकांच्या पैशावर मजा करण्यासाठी कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थळी जाणार आहेत. अभ्यास दौरा असे नेहमीप्रमाणे गोंडस नाव त्यासाठी दिले गेले असले तरी तब्बल ४५ लाखांची उधळपट्टी करण्याचा घाट घालण्यात आला आहे.मीरा-भाईंदर महापालिकेच्या साफसफाई, पाणी पुरवठा आदी सेवा तोट्यात असतानाच पालिकेवर विकासकामांसाठी कर्जाचा बोजा असल्याचे कारण सांगून सत्ताधारी भाजपाने नागरिकांवर पाणीपट्टी व मालमत्ता दरात वाढीसह नव्याने मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क व पाणीपुरवठा लाभ कराचा बोजा मंजूर केला. परंतु एकीकडे थकबाकी वसुली करायची नाही, कार्यक्रम व दालनांसाठी उधळपट्टी तसेच विविध समस्यांची मांदियाळी, अनागोंदी असताना भाजपाने नागरिकांवर मोठ्या प्रमाणात करवाढ लादल्याच्या निषेधार्थ विविध स्तरातून टीकेची झोड उठू लागली. त्यामुळे महासभेत भाजपाने पाणीपट्टी व मालमत्ता दरात वाढीसह घनचकरा शुल्क आकारण्यास मंजुरी दिली.नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकताना दुसरीकडे डासांच्या निर्मूलनासाठी फवारणी करणाºया १८० कर्मचाºयांना पैसे नाहीत म्हणून कामावरून कमी करण्यात आले. परंतु दुसरीकडे मात्र स्थायी समितीमध्ये सर्व ९५ नगरसेवकांसाठी अभ्यासदौºयाच्या नावाखाली पर्यटनस्थळी मजेसाठी जाण्याचा ठराव मंजूर केला आहे. कूर्ग येथे हा अभ्यास दौरा जाणार आहे. त्यासाठी ४५ लाखांची तरतूद करून ठेवली आहे. आधी २० ते ३० एप्रिल दरम्यान हा दौरा काढण्याचे ठरवले होते. परंतु अनेक नगरसेवकांनी मुलांच्या परीक्षा आदी कारणे पुढे केल्याने आता २ ते ६ मे अशी दौºयाची तारीख निश्चित केली आहे.या दौºयासाठी येण्यास इच्छुक असणाºया नगरसेवकांकडून सचिव कार्यालयाने संमती पत्रे मागवली आहेत. ज्यांना दौºयाला यायचे आहे त्यांनी होय वा यायचे नसल्यास नाही म्हणून लेखी स्वरुपात पत्र द्यायचे आहे. आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी लेखी पत्र देऊन कूर्ग येथील दौºयाला येणार असल्याची संमती दिली आहे असे सूत्रांनी सांगितले.नगरसेवक हे विमानाने मेंगलोर येथे जातील. कूर्ग येथे ३ रात्र तर उडपी येथे एक रात्र असा या नगरसेवकांचा मुक्काम असेल. नगरसेवक पर्यटनाची मजा लुटणार आहेत. गोल्डन टेम्पल म्हणून ओळखले जाणारे नमुद्रलिंग मठ, कुशलनगर येथील एलिफंट दुबारे, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, कावेरी नदीच्या उगमस्थानी असलेले तालकावेरी आदी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना नगरसेवक भेटी देतील. अलिशान तारांकीत हॉटेलमध्ये ते राहणार आहेत. नगरसेवक अभ्यास दौºयाच्यानावाखाली मजेसाठी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.केवळ एक दिवस उडपी पालिकेला भेटतीन रात्र व चार दिवस कूर्ग या पर्यटनस्थळी नागरिकांच्या पैशांमधून पर्यटनाचा आनंद लुटतील. तर फक्त एक दिवस उडपी महापालिकेला भेट देतील अशी माहिती सूत्रांनी दिली.विशेष म्हणजे या आधीही अभ्यास दौºयाच्या नावाखाली नगरसेवक व अधिकाºयांनी देशभरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी नागरिकांच्या पैशातून मजा केली आहे. अगदी काही अन्य पर्याय शोधून परदेश दौरेही केले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर