शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीवरच गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:16 IST

१ मे पासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे.

डोंबिवली/कल्याण : ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास महाराष्ट्र दिनापासून कचरा न उचलण्याची दमदाटी करणाºया, फौजदारी गुन्ह्याची भीती घालणाºया कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावरच कचरा विल्हेवाट व व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता लोकांना धमक्या कसल्या देता आणि आपल्या अपयशाचे खापर लोकांच्या ‘बोडक्या’वर कशाला मारता, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.कचºयाचे वर्गीकरण न करणाºया आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. १ मे पासून कचरा उचलला जाणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेवर डोंबिवलीकरांनी तीव्र व तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.घनकचरा व्यवस्थापनाची नियमावली पालिका प्रशासनाने २००२ सालापासून अवलंबली नाही. प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने प्रशासनाचे अनेकदा कान उपटले. तसेच घनकचºयाची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील महापालिकेकडून प्रकल्प उभारण्याचे काम सुरूच आहे. कागदी घोडे नाचवले जात आहेत. लोकांवर नव्हे तर महापालिकेने प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केली म्हणून महापालिकेविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याकरिता वार्षिक १८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली महापालिका नागरिकांना डस्टबिन देऊ शकत नाही का? त्यामुळे कचरा उचलला नाही तर नागरिकांनी ओला, सुका कचरा गोळा करून तो आयुक्तांच्या दालनातच टाकावा. तेव्हाच त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील.- सुहास तेलंग, नामांकित वकीलशहरातील रस्ते अरुंद आहेत. शहरात अतिक्रमणे आहेत. मोठ्या बसगाड्यांना रस्त्यावर वळण्यास जागा नाही. वाहतूककोंडी होत आहे. इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. आधीच नागरी सुविधांकरिता पुरेशी जागा नाही. अशा परिस्थितीत सोसायट्यांनी ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करण्याकरिता जागा कुठून आणायची. खतनिर्मितीकरिता जागा तरी महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. मगच असे उफराटे फतवे काढावे. कचरा वर्गीकरणास विरोध असण्याचे कारण नाही. कचरा वर्गीकरण करण्याच्या धमक्या दिल्याने ते केले जात नाही. कचºयापासून खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण लोकांना प्रशासनाने दिले का? सक्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केला, तर तो होणार नाही. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. हौसेने कुणी बागेत कचºयापासून खत तयार करत असेल. मात्र, सक्तीने ते करण्यास भाग पाडू नका.- प्रा.डॉ. उदयकुमार पाध्येकचरा वर्गीकरण करणे, ही कल्पना वाईट नाही. मात्र, हा निर्णय नागरिकांवर लादून चालणार नाही. त्याची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी नागरिकांना सवय लावणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर सक्ती करता येईल. काल जाहीर केले आणि आज झाले, असे होत नाही. ही एक प्रक्रिया आहे. पण हेच महापालिका प्रशासनाच्या डोक्यात उतरलेले नाही. कारण त्यांच्या डोक्यात केवळ कचरा आहे. १ तारखेपासून कचरा उचलणार नाही, असे जाहीर करण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना देणाºया नोटिसा पाठवल्या आहेत का? या प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. चार दिवसांत दोन लाख मालमत्ता, ९० हजार आस्थापनांना नोटिसा कशा पाठवणार. त्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.- निलेश भणगे, प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअरसोसायटीचे प्रमुख

टॅग्स :thaneठाणे